राज्य सरकारचा जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय;पटसंख्या वाढणार?
राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील दिलासादायक बातमी आहे.
मुंबई : राज्य सरकारकडून (State Govt) जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद शाळेत ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग सुरु होणार केले जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळेंची पटसंख्या खालवली आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांभावी (Student) बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्युनिअर आणि सिननिअर केजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या माध्यमातून गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
दुसरीकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लवकरच विविध विभागांमध्ये एमपीएससीमार्फत भरती केली जाणार आहे.
75 हजार जागांवर भरती
तसेच राज्यभरात सरळसेवेच्या माध्यमातून जवळपास 75 हजार जागांवर भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांमार्फत भरली जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, रोजगारात देखील वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय आहे.