JEE Main Viral: जे बात ! मजुराच्या मुलाला पहिल्याच प्रयत्नात जेईई मेन परीक्षेत 99.93 पर्सेंटाईल

| Updated on: Jul 12, 2022 | 3:16 PM

Deepak Prajapati: आत्मविश्वासाच्या जोरावर आज दीपक खूप पुढे आलाय आणि तो त्याचे स्वप्न साकारू शकतो! आज दीपक अशा खूप मुलांसाठी उदाहरण आहे ज्या मुलांना आपल्या अडचणीच सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत असं वाटतं. दीपक त्या सगळ्या मुलांना दाखवून देतो की अडचण असणं ही फार सततची गोष्ट आहे. त्यासाठी सातत्य हा एकच मार्ग आहे. 

JEE Main Viral: जे बात ! मजुराच्या मुलाला पहिल्याच प्रयत्नात जेईई मेन परीक्षेत 99.93 पर्सेंटाईल
Deepak Prajapati MP Indore JEE Main
Image Credit source: Social Media
Follow us on

इंदौर:“मी अजूनही सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियापासून लांब आहे. मला कंटाळा आला की मी बॅटमिंटन, फूटबॉल खेळतो” असं अभ्यासावर अत्यंत फोकस असणारा इंदौरचा (Indore) दीपक प्रजापती (Deeepak Prajapati JEE MAin) म्हणतो. दीपक प्रजापती! वयाच्या सातव्या वर्षी शाळेतला एकदम ‘ढ’ मुलगा. त्याच्या मार्कशीटवर देखील “अभ्यासात अत्यंत वाईट” असं लिहून आलेलं होतं. घरची परिस्थिती जेमतेम. खरंतर वाईटच म्हणावी अशी घरची परिस्थिती. वडील वेल्डिंगचं काम करतात, त्यांच्या या कामातून कसं बसं घर चालतं. असा हा सगळ्यांसाठीच उत्तम उदाहरण असलेला दीपक,याला जेईई मेन 2022 (JEE Main 2022) च्या पहिल्या सत्रात 99.93 पर्सेंटाईल मिळाले आहेत त्यामुळे त्याचं सगळीकडे जाम कौतुक होतंय. विशेष म्हणजे हा पहिल्याच प्रयत्नात त्यानं हे यश मिळवलंय.

IIT-Kanpur! स्वत:ला वचन…

दीपकचे वडील, राम इकबाल प्रजापती हे वेल्डर म्हणून काम करतात, त्यांच्याकडे स्थिर काम नाही आणि ते उदरनिर्वाहासाठी वेगवेगळी नोकरी करत असतात. दीपकने आपल्या अभ्यासात सातत्याने सुधारणा केली आणि दहावीत 96% मिळवले. यामुळे त्याच्या सरकारी समुपदेशकांच्या लक्षात आले, ज्यांनी त्याला करिअरचे पर्याय दाखवले. तो म्हणाला, “मला अभियांत्रिकीच्या संकल्पनेचे आकर्षण आहे, म्हणून मी स्वत:ला वचन दिले की मी आयआयटी-कानपूरमध्ये संगणक विज्ञान अभियांत्रिकीचा अभ्यास करेन. त्याने आपल्या पालकांना सांगितले की जेईईची तयारी करण्यासाठी त्याला इंदौरला जायचे आहे. त्यांनीही होकार दिला. दीपक जेईईच्या तयारीसाठी दिवसाचे 13-14 तास वेळ देत असे.

आत्मविश्वासाच्या जोरावर

“अभ्यासात अत्यंत वाईट”, ‘नो-होपर’ अशा प्रराकारच्या बऱ्याच कमेंट्स दीपकवर शिक्षकांकडून करण्यात आल्या पण दीपकने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला. वर्गातून काढून टाकल्यापासून दीपक पेटून उठला, कुटूंबाने पाठिंबा दिला, मेहनत केली आणि हे प्रेरणादायी यश मिळवलं. आत्मविश्वासाच्या जोरावर आज दीपक खूप पुढे आलाय आणि तो त्याचे स्वप्न साकारू शकतो! आज दीपक अशा खूप मुलांसाठी उदाहरण आहे ज्या मुलांना आपल्या अडचणीच सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत असं वाटतं. दीपक त्या सगळ्या मुलांना दाखवून देतो की अडचण असणं ही फार सततची गोष्ट आहे. त्यासाठी सातत्य हा एकच मार्ग आहे.

हे सुद्धा वाचा