Aurangabad : अब्दुल सत्तार अन् टीईटी प्रकरणावरुन शिक्षण उपसंचालकांचा मोठा खुलासा, पत्रात नेमकं दडलयं काय?
अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटीमध्ये झालेल्या घोटाळ्यात जोडण्यात आली आहेत. त्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी मात्र, या प्रकरणाशी आपलाच कसलाच संबंध नसल्याचे सांगितले आहे. यातच आता शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांचे खुलासा देणारे पत्र व्हायरल होत आहे.
औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET Exam) टीईटीमधील घोटाळ्यात (Abdul Sattar) आ. अब्दुल सत्तार यांचेही नाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन सत्तार हे सोमवारी दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. शिवाय विरोधकांनीही त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळणार की नाही इथपर्यंत चर्चा येऊन पोहचली असताना आता (Deputy Director of Education) शिक्षण उपसंचालकाच्या खुलास्याचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे कुठलाही लाभ घेतला नसल्याचे हे पत्र आहे. हिना कैसर अब्दुल सत्तार आणि उजमा नहीद अब्दुल सत्तार यांनी कुठलेही लाभ घेतले नसल्याचे उपसंचालक अनिल साबळे यांनी या पत्रात म्हटलेले आहे.
काय आहे उपसंचालकांच्या पत्रात?
अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटीमध्ये झालेल्या घोटाळ्यात जोडण्यात आली आहेत. त्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी मात्र, या प्रकरणाशी आपलाच कसलाच संबंध नसल्याचे सांगितले आहे. यातच आता शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांचे खुलासा देणारे पत्र व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की, अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे कुठलाही लाभ घेतलेला नाही. नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या पत्राला उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला आहे. तर हे खुलासा केलेले पत्र आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आरोप झाल्याने सत्तारांच्या वाढल्या अडचणी
आ. अब्दुल सत्तार यांच्या मुला-मुलीने टीईटी प्रमाणपत्राचा वापर करुन सेवेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. उद्या मंत्रिनमंडळाचा विस्तार होत असताना अशाप्रकारे अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने त्यांचा मंत्रिपदाच्या निवडीवर काय परिणाम होणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. शिवाय विरोधकांनीही सत्तारांना टार्गेट करीत चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरापसून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या सत्तारांबद्दल काय निर्णय घेतला जाणार हे पहावे लागणार आहे.
खुलासा पत्र सोशल मिडियात
शिक्षण उपसंचालक यांनी केलेल्या खुलाश्याचे पत्र आता सोशल मिडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे सत्तारांना दिलासा मिळणार की चौकशीचा सिसेमिरा मागे लागणार हे पहावे लागणार आहे. एवढेच नाही तर त्यांच्या एका समर्थकाने तर अब्दुल सत्तार यांना या प्रकरणावरुन मंत्रिपद डावलण्यात आले तर आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या सर्व प्रकरणावर काय निकाल होतो हे पहावे लागणार आहे.