बारावीच्या परीक्षांवर काय निर्णय होणार? रमेश पोखरियाल यांची सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक
रमेश पोखरियाल निशंक आज सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाच्या सचिवांसोबत ऑनलाईन बैठक घेणार आहेत
नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhiryal Nishank) आज सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाच्या सचिवांसोबत ऑनलाईन बैठक घेणार आहेत. बैठकीचा मुख्य उद्देश कोरोना स्थितीचा आढावा घेणे आणि ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेणे हा आहे. रमेश पोखरियाल नवीन शिक्षण धोरणाविषयी देखील चर्चा करण्याची शक्यता आहे. बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank to address state education ministers and secretaries today via online meeting)
बोर्ड परीक्षांवर निर्णय शक्य
कोरोना विषाणू संक्रमणामुळे देशातील काही राज्यांनी परीक्षेशिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एप्रिलमध्ये सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा आढावा घेऊन सीबीएसई, आयसीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट कायम असताना तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत काय चर्चा होणार आणि काय निर्णय होतोय याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेले आहे.
‘निशंक’ यांना मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान
भारताचे शिक्षण शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना वैश्विक महर्षी महेश योगी संघटना आणि जागतिक महर्षी विद्यापीठांकडून देण्यात येणारं ‘आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक’, जाहीर झालं आहे. ही घोषणा 110 देशांच्या अधिवेशनात झाली. या सन्मानाची घोषणा करताना डॉ.टोनी नाडर यांनी रमेश पोखरियाल निशंक यांचं लेखन आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य प्रस्थापित करणारं आहे, असं म्हटलं.
बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
कोरोना विषाणू संसर्गामुळं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ममता शर्मा यांनी बारावीची परीक्षा रद्द करुन निकाल जाहीर करण्याची मागणी केलीय. बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ पद्धत अंमलात आणावी, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
36 जिल्हे 72 बातम्या | 17 May 2021 https://t.co/OrWwsS67KT #News #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
संबंधित बातम्या:
Atal Pension Yojana: दर महिन्याला फक्त 42 रुपये गुंतवणूक करा; आयुष्यभर खात्यात येणार पैसे
CBSE Exam 2021: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
हेही पाहा
Education Minister Ramesh Pokhriyal Nishank to address state education ministers and secretaries today via online meeting