दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, वर्षा गायकवाड यांची घोषणा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी तयार करत आहे. Question bank SSC and HSC
मुंबई: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे, असं सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी तयार करत आहे. (Education Minister Varsha Gaikwad announced question bank is under preparation for students of class SSC and HSC)
शिक्षणमंत्र्यांचं ट्विट
इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी @scertmaha तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत.या प्रश्नपेढ्या https://t.co/Ugilxs0qsF या संकेतस्थळावर तयार होतील; तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/sympWtsgzY
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 15, 2021
प्रश्नपेढ्या कुठं उपलब्ध होणार?
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून प्रश्नपेढी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार
नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलीय.
अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला https://t.co/RKyrO73qSo #ATS #SachinVaze #NIA #ambanihouse
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2021
संबंधित बातम्या:
SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!
(Education Minister Varsha Gaikwad announced question bank is under preparation for students of class SSC and HSC)