EDUCATION NEWS : शालेय साहित्य महागलं, पालकांच्या खिशावर पडणार अधिकचा भार; जाणून घ्या वाढलेले भाव
ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्येही शैक्षणिक साहित्य विक्रीस असून, पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रीत विविध कंपन्यांची रस्सीखेच असून दर्जेदार सहित्यास ग्राहक आकर्षित होत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.
मुंबई – दोन वर्षात कोरोनामुळे शिक्षणात (Education) टंगळमंगळ झालेली पाहायला मिळाली. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी पुन्हा शैक्षणिक वर्षे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. पण यंदा विद्यार्थ्यांच्या (Student) शाळेय वस्तू खरेदी करताना पालकाची (Parent) दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे कच्च्या कागदाच्या मालाचे भाव वाढल्याने शिक्षण साहित्यात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. साहित्यात झालेल्या भाव वाढीमुळे पालकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. बाजारात नवनवीन नोटबुकसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. शालेय साहित्याबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे साहित्य देखील दाखल झाले आहे.
शालेय साहित्याचे असे आहेत दर (डझनानुसार)
100 पेजेस वह्या : 132 ते 216 रुपये
200 पेजेस वह्या : 216 ते 360 रुपये
लॉग बुक 100 पेजेस : 216 ते 300 रुपये
लॉग बुक 200 पेजेस : 240 ते 400 रुपये
ए फोर साईज : 300 ते 800 रुपये
कंपासपेटी : 50 पासून ते 300 रुपयांपर्यंत
मुलांना आवडणाऱ्या वस्तू महाग
ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्येही शैक्षणिक साहित्य विक्रीस असून, पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रीत विविध कंपन्यांची रस्सीखेच असून दर्जेदार सहित्यास ग्राहक आकर्षित होत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. नोटबुक कंपासपेटी, नोट पॅड, लहान मुलांना वापरात असलेली पाटी, पेन, दप्तर, अंकलिपी या वस्तूंना वाढती मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. जरी शाळेत पुस्तके मोफत मिळणार असली तरी वह्यांचे नानाविध प्रकार बाजारात आले आहेत. बदलत्या काळानुसार मुलांना आवडणाऱ्या वस्तू देखील महाग झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे साहित्य उपलब्ध नाही
अभिनेता, निसर्गरम्य चित्र, फुले पक्षी, प्राणी, कार्टुन या छायाचित्रांसह बहुरंगी वह्यांना मुलांची प्रत्येकवर्षी अधिक पसंती असते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा शैक्षणिक साहित्यात दरवाढ झाली असून, पालकांमध्ये नाराजी आहे. परंतु, बालकांच्या मनाप्रमाणे साहित्य विक्रीस उपलब्ध असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. तर, शालेय साहित्यात भाववाढ झाली आहे.
मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून साहित्य घ्यावेचं लागेल असंही पालक म्हणत आहेत.