वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने (farmer son) आपल्या मुलाला शेतात मोल मजुरी करुन चांगलं शिक्षण दिलं. त्या मुलाने सुद्धा जिद्दीने चांगलं शिक्षण घेतलं. समाधान कांबळे (samadhan kamble) असं तरुणाचं नाव असून त्याने फेलोशिप मिळवली असल्यामुळे तो पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया (australia) या देशात रवाना झाला आहे. समाधान कांबळे याच्या आई-वडिलांनी शेतात मजुरी करुन शिकवणी दिली. आई-वडीलांच्या मोल मजुरीचं चीज झालं अशी वाशिम जिल्ह्यात सगळीकडे चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे समाधानच्या आई-वडिलांना मोठा आनंद झाला आहे.
उच्च शिक्षणासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांची फेलोशिप मिळवणारा वाशीम जिल्ह्यातील पांगरी येथील शेतकरीपुत्र समाधान कांबळे उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.
वाशीम जिल्ह्यातील पांगरी धनकुटे येथील गरीब कुटुंबातील शेतमजुरी करुण आपला उदरनीर्वाह करणाऱ्या कुटुंबातील समाधान कांबळे याने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. काल तो ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी रवाना झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
समाधानचे वडील उत्तम कांबळे हे शेतकरी असून शेतात मोलमजुरी करून त्यांनी समाधान कांबळे या त्यांच्या मुलाला शिकवले, मुलाने देखील आई वडीलाच्या परिश्रमाचे चिज करीत पुणे येथील सिंहगड ॲकाडमी ऑफ इंजिनियरिंग कॉलेजमधून द्वितीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती विषयीची माहीती समाधान कांबळे याने मिळविली होती. त्यानंतर त्याने तिथं अर्ज दाखल केला होता. त्याच्या अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांची परदेशातील शिक्षणासाठी निवड झाली. आता तो ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न नामांकित विद्यापीठात मास्टर ऑफ सिव्हील इंजीनियरिंगच शिक्षण घेण्यासाठी गेला आहे.