पुणे: एमपीएससीकडून संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अराजपत्रित गट ब च्या उत्तरतालिकेत चुकीचं उत्तर देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत टीव्ही 9 मराठीनं विद्यार्थ्यांनी नोंदवलेले आक्षेपही दाखवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर अंतिम उत्तर तालिका नव्याने जाहीर करत 27 क्रमांकाचा प्रश्न रद्द केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय झाल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एमपीएससीनं घेतलेल्या पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा 4 सप्टेंबरला घेतली होती. त्यानंतर उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. मात्र, त्याचा विचार करण्यात न आल्याचा दावा विद्यार्थ्यांचा होता. त्याची टीव्ही 9 मराठीनं दखल घेतली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 4 सप्टेंबरला घेतलेल्या पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिका कोड अ मधील प्रश्न क्रमांक 27 बद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप आहे. आयोगानं विचारलेल्या प्रश्नात चूक असल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असल्यानं त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात आयोगानं अंतिम उत्तर तालिकेत कोणताही बदल केला नसल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे. आयोगानं 27 व्या प्रश्नात 4 विधानं दिली होती. त्यापैकी गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे, असं विधान त्यामध्ये होतं. विद्यार्थ्यांचा या विधानावर आक्षेप आहे. गौताळा राष्ट्रीय अभयारण्य असून ते उद्यान नसल्याचं विद्यार्थ्यांनी आयोगाला कळवलं होतं. मात्र त्याचा विचार करण्यात आलेला नाही. हे विधान प्रश्न विचारण्यात आलेलं विधान योग्य ग्राह्य धरल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/uop1fbdWKU
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 25, 2021
MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा