आयआयटी होण्यात आले अपयश, आता तब्बल 500 अब्ज डॉलरच्या कंपनीत जॉब, रीति कुमारी हीच्या जिद्दीची कहाणी
रिति कुमारी हीला दहावी आणि बारावीला चांगले मार्क होते. तिला आयआयटी करायचे होते. परंतू त्यात यश आले नाही. नंतर तिने करीयरचा प्लान बी वापरत सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन वॉलमार्टपर्यंतचा प्रवास केला.
नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : रिति कुमारी हीला आयआयटी प्रवेश मिळाला नाही तेव्हा तिला वाटले होते आता सर्व संपले आहे. तिच्या ट्वीटरवर तशी पोस्ट केली होती. तिला दहावीत 9.6 सीजीपीए आणि बारावीत 91 टक्के मिळाले होते. त्यामुळे तिने प्रतिष्ठीत आयआयटी संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी JEE परीक्षा दिली. परंतू तिला यश न मिळाल्याने तिने हार मानली नाही. तिने तिचा प्लान बी सुरु केला आणि 13 मुलाखती दिल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वॉलमार्ट कंपनीत नोकरी मिळविली आहे.
रीति कुमारी हिने आयआयटी प्रवेशासाठी प्रयत्न केला तेव्हा त्यात अपयश आले. त्यामुळे आपण जीवनात आता काही करु शकणार नाही असे तिला वाटले. वडीलांचे पैसे वाचविण्यासाठी तिने सरकारी कॉलेजात प्रवेश केला होता. ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. तिला आयआयटी क्रॅक करायची होती. तिने GATE ची तयारी सुरु करण्याचा विचार केला होता. परंतू तो सोडून दिला.
एकदा रीति कुमारी लिंक्डइनवर सर्च करीत असताना तिला कंपन्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची गरज होती असे कळले. त्यानंतर तिने करीयरचा नवा पर्याय सुरु केला. तिचा पहिला इंटरव्यूह एकोलाईटमध्ये झाला. तिने एकूण 12 इंटव्यूह दिले.
आता वॉलमार्टमध्ये जॉब
रिति कुमारी हीने ट्वीटरवर लिहीले आहे की माझी सर्वांना विनंती आहे की लोक अपयश आल्यानंतर धैर्य हरवितात आणि उदास होतात. आपणापैकी प्रत्येक जण या परिस्थितीतून गेला आहे. आणि एक चांगला यशस्वी माणूस म्हणून बाहेर आला आहे. आयआयटीत प्रवेश मिळविण्यात अयशस्वी झाले म्हणून काही नुकसान नाही. कारण मी आता जेथे काम करत आहे तेथे केवळ अग्रगण्य कॉलेजातील लोक काम करतात. रिति कुमारी हीने तिचे इंजिनिअरींग वीबीयूच्या युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजीमधून केले आहे.