Student Welfare Scheme : परीक्षेत 60% गुण मिळवा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्या, लखनऊ विद्यापीठाची स्टुडंट वेलफेअर फंड योजना
लखनऊ विद्यापीठात प्रवेश घेणार्या गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी कल्याण योजनेंतर्गत 60 टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. (Get 60% marks in exams and avail scholarships, Student Welfare Fund Scheme of Lucknow University)
लखनऊ : लखनऊ विद्यापीठाकडून गरीब घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. लखनऊ विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कल्याण योजना सुरू करणार आहे. या योजनेमुळे विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीच्या त्रासातून दूर ठेवले जाईल. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. लखनऊ विद्यापीठात प्रवेश घेणार्या गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी कल्याण योजनेंतर्गत 60 टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. विद्यापीठातून अशा विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा तपशील पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. (Get 60% marks in exams and avail scholarships, Student Welfare Fund Scheme of Lucknow University)
नोकरीची संधी मिळेल
या योजनेबरोबरच लखनऊ विद्यापीठ (लखनऊ) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक सुविधा देणार आहे. विद्यार्थी कल्याण निधी योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये मिळतील. यासह नोकरी करून पैसे मिळवण्याची संधीही त्यांना मिळणार आहे. ही बातमी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी आहे. या योजनेचा तपशील विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
शिष्यवृत्तीसाठी अटी
ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याण योजनेंतर्गत आतापर्यंत विद्यार्थी कल्याण योजना मदत दिली गेली होती. परंतु विद्यापीठाकडून आता या धोरणात हदल करण्यात आले आहे. कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करुन आता तीन लाख रुपये करण्यात आले आहे. बदल होण्यापूर्वी विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण शिक्षणादरम्यान एकदाच पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. यात आता वाढ होऊन ती 15 हजार रुपये करण्यात आली आहे.
युपी बीएड जेईईची मुदत वाढवली
लखनऊ विद्यापीठाने बीएड संयुक्त प्रवेश परीक्षा (यूपी बीएड जेईई 2021) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आता विना विलंब शुल्काशिवाय 24 मार्चपर्यंत अर्ज भरु शकतील. यापूर्वी शेवटची तारीख 15 मार्च 2021 होती. (Get 60% marks in exams and avail scholarships, Student Welfare Fund Scheme of Lucknow University)
कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता#ColabaSlumRehabilitation #ThackerayGovernment #Uddhavthackerayhttps://t.co/72jQJgMw43
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2021
इतर बातम्या