अनेकदा प्रत्येक पालक भविष्यात आपल्या मुलाचे शिक्षण (Child Education) कोणत्या शाळेत करायला हवे, याबद्दल विचार करत असतात. आपल्या मुलांना चांगली शैक्षणिक सुविधा कोठे मिळेल, याबद्दल नेहमी सतर्क राहतात. बहुतेक वेळा आपल्या मुलांना खाजगी म्हणजेच प्रायव्हेट शाळेत (Private School) आपल्या मुलाला कसे एडमिशन मिळेल? याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला असे वाटते की, प्रायव्हेट शाळेत आपल्या मुलाला शिकायला पाठवल्यास मुलांची बुद्धीमत्ता सुधारेल व मुलांचे भविष्य उज्वल होईल, असे अनेक पालक (Parents) आपल्या मनात एक समज करून ठेवतात. मुलांच्या शैक्षणिक दर्जा सुधारायचं असेल तर आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्येच ऍडमिशन करायला हवे, याबद्दल सुद्धा अनेक पालक परस्पर निर्णय घेत असतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, असे अजिबात नाहीये.
काही दिवसांपूर्वी एक संशोधन करण्यात आलेले आहे आणि या संशोधनामध्ये सांगण्यात आले आहे की, जास्तीत जास्त आईवडील असे मानतात की, जर आपल्या मुलाला प्रायव्हेट शाळेमध्ये आपण शिकवायला पाठवल्यास त्यांच्या मुलांना भविष्यात चांगले यश मिळेल आणि त्यांचे जीवनमान व शैक्षणिक गुणवत्ता परिपूर्ण राहील. त्यांना जीवनामध्ये यश लवकर प्राप्त होईल. अशा प्रकारची धारणा चुकीची आहे की बरोबर याबद्दल अद्याप ठोस पुरावे हाती लागले नाहीये.
न्यू इंग्लंड युनिव्हर्सिटी येथे एज्युकेशन आणि सायकॉलॉजी मध्ये पीएचडी करत असणाऱ्या लार्सन आणि अलेक्झांडर फोर्ब्स यांनी आपल्या एका रिसर्च पेपर मध्ये याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे., द कन्वरसेशन या वर्तमानपत्रांमध्ये हा रिसर्च पेपर प्रकाशित झालेला आहे.
ऑस्ट्रेलिया येथे नर्सरी ते चौथीपर्यंत 30 टक्के मुले आणि पाचवी ते आठवी पर्यंत 40 टक्के मुली प्रायव्हेट शाळांमध्ये शिकतात. प्रायव्हेट शाळेची फी ही त्यांच्या गुणवत्तेनुसार किंवा शाळेच्या मान्यतेनुसार ठरवली जाते. अनेकदा प्रत्येक प्रायव्हेट शाळेची फी वेगळी असते. कॅथलिक शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी लागणारी फी अन्य प्रायव्हेट शाळा पेक्षा कमी असते. या शाळेमध्ये एका कुटुंबाची वर्षाला 40 हजार डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात.
सांगायला जरी या स्वतंत्र शाळा असल्या तरी ऑस्ट्रेलियातील सर्व शाळांना सरकारी अनुदान प्राप्त होते. त्यातली शाळांना अंदाजे 75 टक्के आणि खाजगी शाळांना 45 टक्के आर्थिक अनुदान राज्य सरकारद्वारे दिले जाते.
नुकत्याच केलेल्या एका अभ्यासाअंतर्गत असे कळाले की, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी नुसार एनएपीएलएएनच्या शाळेत शिकणारी मुलं ही सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांपेक्षा वेगळी नव्हती. हा निष्कर्ष ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेलेला संशोधनामधील महत्त्वाचा मुद्दा ठरला. या संशोधनामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने पुढे आला की, एकंदरीत कुटुंबाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये शिकवण्याची संभवता आणि शैक्षणिक उपलब्धता मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरते.
मुलांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश दिल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रामुख्याने आपल्याला सुधारणा जाणवते परंतु जेव्हा आपण सामाजिक गोष्टींबद्दल चर्चा करतो तेव्हा ही मुले या सर्व प्रकरणांमध्ये मागे असतात. 68 शिक्षण तांत्रिक प्रणाली यांचा प्रामुख्याने विश्लेषण करण्यात आले परंतु असे सुद्धा काही क्षेत्र होते ज्यांचे यामध्ये समावेश केला गेला आहे, ज्याना शिक्षण प्रणाली म्हणून ओळखले जाते. 2018 प्रोग्राम फॉर इंटरनेशनल असेसमेंट (पीआईएसए) या उपक्रमांतर्गत सिद्ध झाले की, प्रायव्हेट शाळांमध्ये शिकणे हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा निकष असतो. प्रत्येक वेळी मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणे चांगले असतेच असे नाही.
ओईसीडी देशांमध्ये आणि 40 शिक्षण तंत्र प्रणाली मध्ये प्रायव्हेट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेक्षा जास्त गुण प्राप्त केले होते. ही घटना त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीवरून ठरवण्यात आली नव्हती. जेव्हा विद्यार्थ्यांच्या शाळेतील सामाजिक आणि आर्थिक स्थितीला लक्षात घेतले गेले तेव्हा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण प्रायव्हेट शाळातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त होते.
ऑस्ट्रेलिया येथे वाढणाऱ्या प्रायव्हेट शाळांच्या क्षेत्राला समर्थन करण्यासाठी एक युक्तिवाद वापरण्यात आलेला आहे. तो युक्तिवाद म्हणजे जर आपण विद्यार्थ्यांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवल्यास त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होते तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा सुद्धा उत्तम उपलब्ध होतात, असा समज सर्वसामान्यांच्या मनामध्ये उतरवण्यात आलेला आहे.
युरोप, अमेरिकेत शिकायला जाताय? योग्य कॉलेज निवडण्यापासून ते खर्चापर्यंत! जाणून घ्या…
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, झाल्या तर कशा; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला!
SSC, CHSL Exam 2022 : उमंग ॲपद्वारे तुम्ही सुद्धा भरू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया !