Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC SSC Exam Date | इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?

बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे.

HSC SSC Exam Date |  इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?
लवकरच मोठी नोकरभरती निघणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 9:39 AM

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे (HSC SSC Exam) वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे (Practical Exam) वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे.

लेखी आणि तोंडी परीक्षा कधी होणार ?

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा  15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.

परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन ?

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. बोर्डाकडून याकरिता तयारीदेखील सुरु करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.

24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार 

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्याल लाटेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे शाळां तसेच महावद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता  येत्या 24 जानेवारीपासून राज्याती इयत्ता पहिली ते इयत्ता  बारावी अशा सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोन प्रतिबंधक नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

महाविद्यालयीन विद्यार्थींनींची सुरक्षा काटेकोरपणे पाळा, तुमच्या कॉलेजची जबाबदारी काय? वाचा सविस्तर

Mumbai school reopen : मुंबईतील शाळांचं ठरलं! 24 तारखेपासूनच सुरू, आदित्य ठाकरेंचं ट्विट

School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.