HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांची जोरदार तयारी, अमरावतीमध्ये केंद्रांची संख्या चौपट
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.अमरावती (Amaravati) जिल्ह्यातही कोरोना संसर्ग कमी झाल्याने आता दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC Exam) परीक्षा लवकरच होणार आहेत.
अमरावती: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.अमरावती (Amaravati) जिल्ह्यातही कोरोना संसर्ग कमी झाल्याने आता दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC Exam) परीक्षा लवकरच होणार आहेत.त्यासाठी अमरावती विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा परीक्षा केंद्रांमध्ये तब्बल चौपट वाढ करण्यात आली आहे. एका परीक्षा केंद्र अंतर्गत काही शाळा उपकेंद्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. दहावीची परीक्षा जिल्ह्यात 662 केंद्रांवर, तर बारावीची 397 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे ऑनलाइन परीक्षा घेतली जात असून, यंदा परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बोर्डानं परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
परीक्षांची तयारी सुरु
कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे ऑनलाइन परीक्षा घेतली जात असून, यंदा परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यंदा परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने परीक्षांची तयारी सुरू केली आहे.
अमरावती जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या चौपट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळानं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आली. बोर्डानं परीक्षा गावातील शाळेतच घेण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात परीक्षा केंद्रांमध्ये तब्बल चौपट वाढ करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात दहावीची परीक्षा 662 केंद्रांवर, तर बारावीची 397 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
75 टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा
विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे
इतर बातम्या: