ICAI कडून CA परीक्षेसाठी नवी घोषणा, विद्यार्थ्यांना नव्यानं करावं लागणार ‘हे’ काम
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडीया (ICAI) ने सीएचा (CA) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
ICAI CA MAY EXAM2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडीया (ICAI) ने सीएचा (CA) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आयसीएआयनं ज्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर 2020 ऐवजी मे 2021 पर्याय निवडला होता त्यांना नव्यानं अर्ज करण्यास सांगितलं आहे. आयसीएआयचा हा नियम CA फाऊंडेशन, सीए इटरमिजीएट ( नवा जूना अभ्यासक्रम), फायनर परीक्षा या सर्वांना नव्यानं अर्ज करावे लागणार आहेत. आयसीएसीआयनं ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जे उमेदवार परीक्षा देणार आहेत, त्यांनी ICAI च्या icai.org या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. (ICAI announced new notification for students check details here)
Important Announcement – Filling of fresh exam forms for May 2021 Exam Cycle is mandatory for Students appearing in May 2021 Exams including those who opted out of Nov 2020 Exam Cycle and had opted for May 2021 Exam Cycle. Detailshttps://t.co/y5xgnS7atR pic.twitter.com/1QUkxcidY6
— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) March 16, 2021
आईसीएआई तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षेसाठी अर्जभरण्याची प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 20 अप्रिल ते 4 मे 2021 या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येईल. इच्छुक उमेदवार ICAI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. परीक्षेसाठी लागणारी फि ही डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे भरण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
इंटरमीडिएट आणि फायनल दोन्ही अभ्यासक्रमांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर
ICAI ने इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांसाठीसुद्धा परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जाहीर तारखांनुसार इंटरमीडिएट आणि फायनल या अभ्यासक्रमांच्या परीक्षा 21 मे पासून सुरु होणार असून 6 जून 2021 रोजी संपतील. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. फायनलमधील पेपर 6 हा दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या कालाधीत होईल.
सीए परीक्षा नोंदणी फी
इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आहे. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आहे. काठमांडू (नेपाळ) केंद्रांमधील उमेदवारांसाठी फी 2200 रुपये आहे. उशिरा 4 मे नंतर आणि 7 मे पूर्वी फी अर्ज करण्यांना 600 रुपये दंड भरावा लागेल. त्याचप्रमाणे परदेशी केंद्राच्या उमेदवारांना 10 युएस डॉलर उशीरा दंड भरावा लागेल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आयसीएआय सीएच्या म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. युजीसीने चार्टर्ड अकाउंटन्सीच्या शिक्षणाला पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिली आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) विनंतीवरून युजीसीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या:
Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस
IBPS CRP RRB IX Officer Result 2021 : ऑफिसर स्केल 2,3 साठी प्रोव्हिजनल यादी जारी, सविस्तर पाहा
(ICAI announced new notification for students check details here)