ICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए फाऊंडेशन जून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.

ICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स
आयसीएआय
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 10:41 AM

ICAI CA Foundation June Exam 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए फाऊंडेशन जून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.  नोंदणीसाठीची अंतिम तारीख 4 मे आहे.तर विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची शेवटची मुदत 7 मे पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. भारतातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क 1500 रुपये तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी 325 अमेरिकनं डॉलर इतकं शुल्क राहील. (ICAI CA Foundation June exam 2021 registration process started apply here )

24  ते 30 जूनपर्यंत परीक्षा

सीए फाऊंडेशन जून परीक्षा 2021 (ICAI CA June Exam 2021) साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 मे 2021 हा आहे. विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची तारीख 7 मे आहे. सीए फाऊंडेशन जून सत्राची परीक्षा 24 जून ते 30 जून पर्यंत चालेल. पेपर 1 आणि 2 दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येईल. तर पेपर 3 आणि 4 दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत आयोजित केली जाणार आहे.

ICAI CA जून सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी कशी करायची?

स्टेप 1: ICAI CA च्या जून मधील सत्राच्या परीक्षेला अर्ज करायचा असल्यास प्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.in या वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2:तिथे परीक्षार्थी नोंदणीवर क्लिक करा. स्टेप 3:विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूकपणे सादर करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. स्टेप 4: परीक्षा फी जमा करावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावा. स्टेप 5:अर्ज डाऊनलोडकरुन त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवावी. स्टेप 6:परीक्षेची फी भरण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर करावा.

सीएच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी आयसीएआयची स्थापना

आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आहे. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आहे. काठमांडू (नेपाळ) केंद्रांमधील उमेदवारांसाठी फी 2200 रुपये आहे.

संबंधित बातम्या:

ICAI कडून CA परीक्षेसाठी नवी घोषणा, विद्यार्थ्यांना नव्यानं करावं लागणार ‘हे’ काम

युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

(ICAI CA Foundation June exam 2021 registration process started apply here )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.