ICAI CA परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

ICAI CA November 2024 Revised Exam Schedule: सीए नोव्हेंबर 2024 अंतिम परीक्षा 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार नाही. आयसीएआयने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सीए अंतिम अभ्यासक्रमासाठी गट तिसरा, पेपर-6 हजारीबाग, जमशेदपूर, रांची, रायपूर आणि दरखंडमधील झुंझुनू राजस्थान येथे घेण्यात येणार होता. आता ही परीक्षा 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत निर्धारित केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

ICAI CA परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या
ICAI CA exam
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 2:51 PM

ICAI CA November 2024 Revised Exam Schedule : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने आयसीएआय सीए नोव्हेंबर 2024 अंतिम अभ्यासक्रम परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सीए नोव्हेंबर 2024 अंतिम परीक्षा 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार नाही. आयसीएआयने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार, झारखंड विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमुळे 13 नोव्हेंबर 2024 रोजी होणारी सीए फायनल कोर्स परीक्षा, ग्रुप 2, पेपर – 6, इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स (मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडीज) पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा कधी होणार हे जाणून घेऊया.

परीक्षा कधी घेण्यात येणार?

सीए अंतिम अभ्यासक्रमासाठी गट तिसरा, पेपर-6 हजारीबाग, जमशेदपूर, रांची, रायपूर आणि दरखंडमधील झुंझुनू राजस्थान येथे घेण्यात येणार होता. आता ही परीक्षा 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत निर्धारित केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

परीक्षेचे प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे?

अधिक माहितीसाठी, उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट icai.org भेट देऊन सुधारित परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जारी केले जाईल, जे उमेदवार नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेचा वापर करून डाउनलोड करू शकतील.

सुधारित परीक्षा वेळापत्रक कसे तपासावे?

आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या icai.org.

होम पेजवर दिलेल्या लेटेस्ट अनाउंसमेंट टॅबवर क्लिक करा.

सीए नोव्हेंबर परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.

आता तपासून प्रिंट काढा.

सीए नोव्हेंबर 2024 सुधारित परीक्षा वेळापत्रक डाउनलोड लिंक उमेदवार या लिंकवर क्लिक करून परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

सीए जानेवारी 2025 परीक्षा कधी?

आयसीएआयने सीए जानेवारी 2025 परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे, त्यानुसार फाउंडेशन कोर्सच्या परीक्षा 12 ते 18 जानेवारी दरम्यान घेतल्या जातील. इंटरमीडिएट ग्रुप 1 ची परीक्षा 11 ते 15 जानेवारी 2025 आणि ग्रुप 2 ची परीक्षा 17 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान होणार आहे.

परीक्षेचे प्रवेशपत्र कधी येणार?

उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट icai.org भेट देऊन सुधारित परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जारी केले जाईल, जे उमेदवार नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेचा वापर करून डाउनलोड करू शकतील.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.