ICAI Result 2021| सीए फाऊँडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट
आयसीएआयकडून घेतल्या जाणाऱ्या सीए परीक्षा 2021 चा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार आहे. ICAI Result 2021
ICAI 2021 Result नवी दिल्ली: इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए परीक्षा 2021 चा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार आहे. आयसीएआय सीए फाऊँडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर घोषित करेल. सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर देखील (ICAI CA Foundation Result 2021) निकाल पाहायला मिळेल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. (ICAI Result 2021 CA Foundation and final old new course result declare today at icai org check direct link)
निकाल कुठे पाहणार?
आयसीएआयकडून निकाल जाहीर केल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहता येईल. उमेदवार त्यांचा निकाल मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकतात.
ICAI CA Foundation, Final (old New Course) Result SMS द्वारे पाहा
सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. फाऊंडेशनचा निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या.
निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार
विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.
Weather Alert | महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम, रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला मातीमोलhttps://t.co/5cSLWqXwdA#Weatheralert | #maharashtra | #UnseasonalRain | #Croploss
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2021
संबंधित बातम्या:
ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल
Success Story : सीएची नोकरी सोडून मधाच्या व्यवसाय, 6 महिन्यात उभारली 30 लाखाची कंपनी
(ICAI Result 2021 CA Foundation and final old new course result declare today at icai org check direct link)