अहमदाबाद : वडिलांच्या मृत्यूनंतर मुंबईच्या (Mumbai) भुलेश्वर परिसरात अगरबत्ती ( Incense Sticks) विकणारा एक मेहनती मुलगा 2005 मध्ये देशातील एका विद्यापीठाचा (MS University) सर्वात तरुण कुलगुरू होतो. पुढे याच मुलाची 5 एप्रिल 2022 ला यूपीएससीच्या चेअरमन पदी निवड होते. मनोज सोनी यांची ही गोष्ट अनेकांना प्रभावित करते.
मनोज सोनी लहान वयातच गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील मोगरी इथल्या स्वामीनारायण पंथाच्या अनुपम मिशनशी जोडले गेले. 10 जानेवारी 2020 ला त्यांना निष्कर्म कर्मयोगी दीक्षा मिळाली.
मनोज सोनींच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं तेव्हा ते पाचवीत होते. त्यांचे वडील भुलेश्वरच्या फुटपाथवर कपडे विकायचे. वडिलांच्या निधनानंतर सोनी यांनी कुटूंबाला हातभार आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या चाळीत अगरबत्ती विकायला सुरुवात केली.
काही वर्षांनंतर 1978 मध्ये त्यांच्या आईने गुजरातमधील आनंद जिल्ह्यात जाण्याचा निर्णय घेतला. बारावी सायन्सच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर मनोज सोनींनी राज रत्ना पीटी पटेल (Raj Ratna PT Patel College) कॉलेजमध्ये आर्टस् साठी प्रवेश घेतला.
अनुपम मिशनचे साधू पीटर पटेल सांगतात, “सोनींचे वडील खूप आधीपासून मुंबईतल्या मिशनचे सदस्य होते. वडिलांच्या मृत्यूनंतर या ऑर्गनायझेशनने मनोज सोनींना त्यांच्या शिक्षणात मदत केली. कॉलेजनंतर त्यांनी एसपी युनिव्हर्सिटी मध्ये शिकवायला सुरुवात केली.”
मिशनमधील सदस्य काम करून पैसे मिळवतात आणि हे पैसे ते समाजसेवेसाठी देतात ज्यात आदिवासी भागातील शाळा, दवाखाने, कॉलेज यांचा समावेश आहे.
2005 मध्ये मनोज सोनी MSU वडोदरा युनिव्हर्सिटीचे आणि 2008 मध्ये अहमदाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते. हा कुलगुरू असण्याचा कालावधी जर सोडला तर पॉलिटिकल सायन्सवर प्रभुत्त्व असणाऱ्या मनोज सोनींनी सरदार पटेल युनिव्हर्सिटीमध्ये (SPU) 1991 ते 2016 च्या दरम्यान इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय शिकवलाय.
आज आपल्या मेहनतीच्या जोरावर यूपीएससीच्या चेअरमनपदी विराजमान झालेले मनोज सोनी कित्येक तरुणांसाठी प्रेरणा आहेत.
इतर बातम्या :