JEE Advanced AAT 2023 Registration: लवकरात लवकर करा रजिस्ट्रेशन, लास्ट डेट आज, 21 जूनला होणार परीक्षा

| Updated on: Jun 19, 2023 | 12:31 PM

JEE Advanced AAT नोंदणी आणि परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी आयआयटी गुवाहाटीच्या अधिकृत वेबसाइटवर जारी अधिसूचना पाहू शकतात. परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की नोंदणी नियमानुसारच करावी लागेल.

JEE Advanced AAT 2023 Registration: लवकरात लवकर करा रजिस्ट्रेशन, लास्ट डेट आज, 21 जूनला होणार परीक्षा
Online registration AAT JEE
Follow us on

गुवाहाटी: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी ने आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट 2023 (AAT) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थी jeeadv.ac.in अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट (AAT) 2023 साठी उमेदवार 19 जून 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करू शकतात.

आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट (AAT) 21 जून 2023 रोजी होणार आहे. 24 जून 2023 रोजी निकाल जाहीर होणार आहे. आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट (AAT) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 24 जूनपासून एएटी-विशिष्ट पर्याय भरता येतील. JEE Advanced AAT परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी IIT रुड़की, IIT मुंबई आणि IIT BHU मध्ये प्रस्तावित बी.आर्क अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात

JEE Advanced AAT 2023 साठी अर्ज कसा करावा

  • jeeadv.ac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • जेईई ॲडव्हान्स्ड एएटी रजिस्ट्रेशन 2023 च्या होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिटवर क्लिक करा.
  • नोंदणी फॉर्म भरा आणि मागितलेली सर्व आवश्यक माहिती भरा.

काल 18 जून 2023 रोजी JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर झाला. तसेच जेईई ॲडव्हान्स्ड एएटी 2023 साठी नोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. हैदराबादच्या कुलगुरू रेड्डी यांनी जेईई ॲडव्हान्स्डमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. टॉप 10 मध्ये हैदराबाद झोनमधील एकूण 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.