JEE Main 2021 : B.Tech आणि B. Arch जेईई मेन परीक्षेला सुरुवात, 6 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणारी जेईई मेन बी.टेक. परीक्षा (JEE Main B.Tech Exam) सुरु झाली आहे.

JEE Main 2021 : B.Tech आणि B. Arch जेईई मेन परीक्षेला सुरुवात, 6 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 11:17 AM

JEE Main 2021 Exam: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणारी जेईई मेन बी.टेक. परीक्षा (JEE Main B.Tech Exam) सुरु झाली आहे. जेईई मेन (JEE Main 2021) फेब्रुवारी 2021 सत्रामध्ये B.Arch आणि B.Planning पेपरने परीक्षेला सुरुवात झाली आहे. जेईई मेन B.Arch चा मंगळवारी झालेल्या परीक्षेची काठिण्य पातळी सरासरी होती, असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे. (JEE Main 2021 B Tech exam started check details)

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन बी.टेक.परीक्षा 2021 इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली जात आहे. तर, B. Arch ची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे.

852 केंद्रांवर परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) नं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले आहे. एनटीएनं या परीक्षेसाठी 852 परीक्षा केंद्रांची निवड केली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये 660 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली होती. सध्या सुरु असलेल्या परीक्षेत देशभरातील 6 लाख 61 हजार 761 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

2 शिफ्टमध्ये परीक्षा

NTA च्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रांना 2 शिफ्टमध्ये पूर्णपणे स्वच्छ केलं जात आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान तपासलं जातं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पेपरपूर्वी दोन तास उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. परीक्षा सुरु असताना केंद्रावर फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे.

संबंधित बातम्या:

जेईई मेन्स 2021 : यंदा चारवेळा परीक्षा, पहिलं सत्र फेब्रुवारीत

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय, UPSC च्या धर्तीवर परीक्षेसाठी फक्त 6 संधी

(JEE Main 2021 B Tech exam started check details)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.