JoSAA Counselling: कधी असणार जेईई मेनचं समुपदेशन? josaa.nic.in अधिकृत वेबसाइट

| Updated on: Aug 09, 2022 | 1:38 PM

यंदा देशभरातून एकूण 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळालं आहे. यातील बहुतांश विद्यार्थी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत. निकालानंतर आता जेईई मेन कौन्सेलिंग (Counselling) 2022 ची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यासाठी JoSAA Counselling केले जाते.

JoSAA Counselling: कधी असणार जेईई मेनचं समुपदेशन? josaa.nic.in अधिकृत वेबसाइट
JEE
Image Credit source: Social Media
Follow us on

JEE Counselling Tentative Schedule: जेईई मेन 2022 चा निकाल (JEE Main Results) जाहीर झाला आहे. स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी, लिंक एनटीए जेईई मेन jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर सक्रिय आहे. जेईई मेन टॉपर्सची (JEE Main Toppers) यादीही जाहीर करण्यात आली आहे. यंदा देशभरातून एकूण 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळालं आहे. यातील बहुतांश विद्यार्थी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत. निकालानंतर आता जेईई मेन कौन्सेलिंग (Counselling) 2022 ची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यासाठी JoSAA Counselling केले जाते.

जेईई मेन समुपदेशन 6 फेऱ्यांत होणार!

अहवालानुसार जेईई मेन काउन्सिलिंग 2022 मध्ये एकूण 6 राऊंड होतील. समुपदेशनात सहभागी होण्यासाठी आधी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. केंद्रीय जागा वाटप मंडळांतर्गत (सीएसएबी) जोएसएएने समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर नोंदणी सुरू होईल. त्यासाठी josaa.nic.in अधिकृत वेबसाइटवर जेईई मेन समुपदेशन नोंदणी लिंक ॲक्टिव्हेट करण्यात येणार आहे.

जेईई मेन्स JoSAA Counselling कधी होणार?

जेईई मेन्स 2022 समुपदेशनाची तारीख संयुक्त जागा वाटप प्राधिकरणाने (जेएसएए) जाहीर केलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की जोसएए समुपदेशन (JoSAA Counselling) वेळापत्रक 2022 ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत josaa.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाईल. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर जेईई मेन समुपदेशन 2022 सप्टेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. सध्या जॉइंट सीट ॲलोकेशन ॲथॉरिटीची वेबसाइट इनऍक्टिव्ह आहे. लवकरच josaa.nic.in 2022 ची वेबसाइट ऍक्टिव्ह करण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी जेईई मेन 2022 समुपदेशनाची प्रत्येक माहिती मिळेल.

हे आहे जेईई समुपदेशन Tentative Timetable

  • जोएसएए नोंदणी आणि चॉइस फिलिंग सुरू होईल – ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात
  • भरलेल्या पसंतीच्या आधारे मॉक सीट ॲलोकेशन – सप्टेंबर पहिल्या आठवड्यात
  • चॉइस लॉक करायची तारीख, कागदपत्र पडताळणी – सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात
  • जागा वाटप फेरी 1, फिजिकल रिपोर्टींग, प्रवेश – सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात
  • दुसरी फेरी – सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात
  • तिसरी फेरी – ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात
  • फेरी 4 – ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात
  • पाचवी फेरी – ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात
  • राउंड 6 अंतिम फेरी – ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात

टीप- हे केवळ संभाव्य वेळापत्रक आहे. त्याची औपचारिक घोषणा झालेली नाही. लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.