Kishore Scientific Incentive Scheme | विद्यार्थ्यांना दर महिना मिळणार 5 ते 7 हजार, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नेमकी काय?
या योजनेतंर्गत विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. (Kishore Scientific Incentive Scheme)
Kishore Scientific Incentive Scheme नवी दिल्ली : भारत सरकारकडून शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावर विज्ञान संबंधित विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत इयत्ता 11 वी, बारावी आणि पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ही योजना भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरुतर्फे चालवली जाते. या योजनेला ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेतंर्गत विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. (Kishore Scientific Incentive Scheme Student Scholarship)
विद्यार्थ्यांना 5 ते 7 हजार मिळणार
किशोर विज्ञान प्रोत्साहन योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या फेलोशिपची विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यास फार मदत होत आहे. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 5 ते 7 हजार रुपयांच्या दोन वेगवेगळ्या फेलोशिप दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी अर्ज करणं गरजेचे आहे.
परीक्षा दोन टप्प्यात
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ही योजना 1999 मध्ये सुरु केली होती. देशभरातील विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये लपलेले कलागुणांना बाहेर आणणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी मदत होईल. राष्ट्रीय स्तरावर या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी एक उच्चस्तरीय प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा मुख्यत: दोन टप्प्यात असते. यातील पहिल्या टप्प्यात ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्ट आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीचा समावेश असतो.
पात्रता काय?
किशोर विज्ञान प्रोत्साहन योजनेतून फेलोशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीत गणित आणि विज्ञानात 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यासोबतच या फेलोशिपमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के सूट दिली जाते.
तर प्रथम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गात 10 टक्के सवलतीसह 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. (Kishore Scientific Incentive Scheme Student Scholarship)
संबंधित बातम्या :
GATE 2021 परीक्षेची उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा सुरु
दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय!
IIT JAM 2021 Answer Key: परीक्षेची उत्तरपत्रिका जारी, अशी करा डाऊनलोड