कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती

डी.के.टी.ई. (DKTE) च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कौशिकी जाधव (Kaushiki Jadhav ) या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ (Australia) या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे.

कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती
कौशिकी जाधव
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:11 AM

कोल्हापूर : डी.के.टी.ई. (DKTE) च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कौशिकी जाधव (Kaushiki Jadhav ) या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ (Australia) या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे. विशेष म्हणजे तिला सुमारे 83 लाख रुपयांची शिष्यवृत्ती केंद्र सरकार मार्फत मिळालेली आहे. कौशिकीने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणा-या आई.एल.टी.एस. परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणा-या समकक्ष परिक्षेसाठी डीकेटीई मध्ये वेळोवेळी तज्ञ प्राध्यपकांचे गेस्ट लेक्चरचे आयोजन केले जात असते. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी फायदा होत असतो. कौशिकीच्या जाधव हिच्या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. कौशिकी जाधव हिला आई.एल.टी.एस यापरीक्षेची तयारी करताना डी.के.टी.ईच्या प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.

संस्थेतील विविध उपक्रमांचा फायदा

कौशिक जाधव हिला मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या स्वायत्त अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी मशिन टूल्स अँन्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, टूल इंजिनिअरींग, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, अ‍ॅटोमेशन, रोबोटीक्स, मशिन डिझाईन या विषयांचा या निवडीसाठी फायदा झालेला आहे. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील बॉश लॅब, स्मार्ट फौड्री, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा व केलेल्या प्रोजेक्टचा देखील या निवडीसाठी फायदा झालेला आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा, लॅब्ज व संशोधनात्मक शैक्षणिक वातावरण यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी चालना मिळत आहे, असल्याची माहिती डीकेटीई संस्थेकडून देण्यात आली आहे.

संस्थाचालकांकडून शुभेच्छा

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर सचिव डॉ.सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांनीस भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. कौशिकीला संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक, प्रा.आर.डी. पाटील, प्रा.एस.ए. सौदत्तीकर व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले सदर निवडीसाठी कोल्हापूरचे प्रा. अभय केळकर यांचे बहुमुल्य सहकार्य मिळाले.

इतर बातम्या :

Chanakya Niti | या 3 प्रकारच्या लोकांपासून जरा लांबच राहा, नाहीतर आयुष्य फक्त नकारात्मक होईल

Nitin Gadkari : नागपूर महापालिकेचं तिकीट कुणाला? ज्याच्या मागं जनता त्यालाच, नितीन गडकरींचा इच्छुकांना सूचक इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.