EDUCATION NEWS : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशात मोठा बदल, जाणून घ्या काय केलाय बदल
प्रत्येकवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्यावेळी गोंधळ पाहायला मिळतो. तसेच अनेकदा पालकांची नाराजी देखील असते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशात बदल करण्यात आला आहे.
मुंबई : कोरोनाच्या (Corona) काळात अनेक विद्यार्थ्यांनी (Student) आपली प्रवेश प्रक्रिया कशी ऑनलाईन करायची ही माहिती करून घेतली आहे. प्रत्येकवर्षी ऑनलाईन प्रवेश (Online Admission) प्रक्रियेत काय तरी बदल झालेला असतो. परंतु यावर्षी काहीसा मोठा बदल करण्यात आला आहे. समजा एखाद्या अकरावीच्या विद्यार्थ्यांला पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आणि त्यांनी प्रवेश नाही घेतला. तर त्याला पुढच्या होणाऱ्या फेऱ्यांमधून बाहेरचा रस्ता न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष त्या विद्यार्थ्यांला फक्त पुढच्या एका फेरीमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर पुढच्या होणाऱ्या सगळ्या फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांला प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे. यासंदर्भात शासनाकडून नुकताच आदेश जारी करण्यात आला आहे.
ऑनलाईन प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे
प्रत्येकवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्यावेळी गोंधळ पाहायला मिळतो. तसेच अनेकदा पालकांची नाराजी देखील असते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आता नोंद करायला सुरूवात देखील केली आहे. सध्याची ऑनलाईन प्रक्रिया ही सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अजिबात अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
15 जूनला निकाल जाहीर होण्याची शक्यता
महाराष्ट्र बोर्डाने 12 वीचा निकाल जाहीर केला असून, त्यानंतर ज्युनिअर कॉलेज म्हणजेच इयत्ता 11 वीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र बोर्डने इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झालेला नाही. मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र प्रवेश बंद करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 11 वीच्या प्रवेशाची अंतिम तारीख 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कळवण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10वीचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.