Maharashtra Board HSC Result 2023 : धकधक… धाकधूक… टेन्शन… इयत्ता 12वीचा निकाल थोड्याच वेळात, कुठे पाहाल निकाल?; जाणून घ्या पटापट
बारावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष ठरतं. जीवनाची, करीअरची पुढली दिशा या परीक्षेच्या निकालावर ठरते. आती वेळ आली आहे . आज दुपारी बारावीचा निकाल लागणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी अनेक अर्थांनी महत्वाचा ठरतो. त्या गुणांवर करीअरची पुढली दिशा ठरवणं सोपं होतं. त्यामुळे बारावीच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही शाखांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यंदा राज्यभरातून तब्बल १४ लाख ५७,२९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षार्थींमध्ये ७ लाख ९२,७८० विद्यार्थी तर ६ लाख ६४,४४१ विद्यार्थिनी आहेत. ९ विभागीय मंडळांत एकूण ३,१९५ केंद्रांवर परीक्षेसाठी ३ लाख २१,३९६ कर्मचारी कार्यरत होते. तसेच परीक्षेसाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला होता.
आज दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे.
कुठे पाहता येईल निकाल ?
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.
निकालाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा