दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी
महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अकरावीला प्रवेश घेतला नसेल तर प्रवेशाची एक संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अकरावीला प्रवेश घेतला नसेल तर प्रवेशाची एक संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी परत एकदा एक विशेष फेरी राबवली जाणार आहे.
विशेष फेरी कधी असेल
अकरावीचा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी परत एकदा विशेष प्रवेश फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ते 22 नोव्हेंबर आणि 23 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान विशेष फेरी राबविली जाणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी
अकरावी प्रवेशाची मुदत संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवण्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे पत्र व्यवहार केला होता. आतापर्यंत 223 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडे विनंती केल्यानं विद्यार्थी संख्या वाढू शकते, अशी शक्यता असल्यानं, विशेष प्रवेश फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.
वर्षा गायकवाड यांचं ट्विट
Over 3.69 lakh students have secured admissions under the Centralised Online Admission to #FYJC after six rounds. Congratulations. But to ensure that no one misses out,we’ll hold one more special round on FirstCome, First Served (FCFS) basis from Nov 16-23. Details below. pic.twitter.com/s1sZCD2hnH
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 12, 2021
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन विशेष फेरीची माहिती दिली आहे. केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे 3.69 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. महाराष्ट्रातील अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील प्रवेशक्षमता 5 लाख 35 हजार 710 इतकी आहे. त्यापैकी 3 लाख 69 हजार 149 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर, 1 लाख 66 हजार 561 जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठी विशेष फेरिचं आयोजन करण्यात आलं आहे. अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घ्या, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
इतर बातम्या:
Teacher Recruitment 2021: मुंबई महापालिकेत डीनबी शिक्षक पदासाठी 25 जागांची भरती, अर्ज कुठं करायचा?
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 13 November 2021
Maharashtra Education Minister Varsha Gaikwad appeal to students to appeal for FYJC Special round admission