मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका मांडली. (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad said we clear the Picture of HSC Exam after High level meeting on CBSE Exam)
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट क करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी पुढाकार केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत मांडली.
उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्ट सहानुभूतीनं निर्णय घेईल. बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्या, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमची प्राथमिकता आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञांची चर्चा सुरु आहे.
Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाhttps://t.co/XTwGWr4GAd #FD #Banks #investments
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2021
संबंधित बातम्या:
(Maharashtra Education Minister Varsha Gaikwad said we clear the Picture of HSC Exam after High level meeting on CBSE Exam)