वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वसतिगृहांना मातोश्री असं नाव देण्यात येणार आहे. Matoshree hostels

वसतिगृहांना 'मातोश्री' नाव, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरे, उदय सामंत
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 6:54 PM

मुंबई: महाराष्ट्र सरकारनं उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वसतिगृहांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वसतिगृहांना मातोश्री असं नाव देण्यात येणार आहे. राज्य शासनानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचं नाव देखील मातोश्री आहे. (Maharashtra Higher and Technical Education department hostels renamed as Matoshree Government Resolution released)

शासन निर्णयात नेमकं काय म्हटलंय?

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या अखत्यारीतील राज्यातील अस्तित्वातील कोणत्याही विशिष्ट नावाने संबोधण्यात न येणाऱ्या मुला-मुलींच्या वसतिगृहांना, तसेच राज्यात यापुढे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या मुला-मुलींच्या वसतिगृहांना “मातोश्री शासकीय वसतिगृह” (मुलांचे / मुलींचे) असे नाव देण्यात यावे. तसेच याच धर्तीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अकृषी विद्यापीठातील मुला-मुलींच्या वसतीगृहांना “मातोश्री वसतिगृह” मुला/ मुलींचे असे नाव देण्यात येणार आहे.

तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश

उच्च शिक्षण विभागाकडील ज्या वसतीगृहांना नाव नाही त्यांना मातोश्री नाव देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्यात यावी, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

मातोश्री नाव का?

शासकीय वसतीगृहे ही केवळ भिंतीचा निवारा न राहता, वसतिगृहे ही मुला, मुलींसाठी आधार, आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणारी आधारगृहे असावीत. वसतिगृहातील मुला-मुलींचं शिक्षण सहज व आनंददायी व्हावे. पालकांच्या मनात मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात ठेवण्याविषयी विश्वास निर्माण व्हावा. मुला-मुलींना आपल्या घरा पासून दूर शासकीय वसतीगृहात राहून शिक्षण घेत असताना वसतीगृह हे स्नेहभाव व जिव्हाळ्याची उब देणारे ठिकाण आहे. हा भाव त्यांच्या मनात रुजावा या उद्देशानं शासकीय वसतीगृहांना मातोश्री वसतिगृह म्हटलं जाईल.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा मधील कलानगर येथील निवास्थानाचं नाव मातोश्री आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय शिवसेनेकडून असून उदय सामंत हे मंत्री आहेत.

संबंधित बातम्या:

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

Shershaah | सिद्धार्थ-कियाराचा शेरशाह चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार!

(Maharashtra Higher and Technical Education department hostels renamed as Matoshree Government Resolution released)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.