HSC Result date 2021 : महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच!

Maharashtra HSC 12th Result 2021 Date : एकीकडे CBSE निकाल आज जाहीर होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे.

HSC Result date 2021 : महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच!
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 3:23 PM

HSC Result date 2021 : मुंबई : एकीकडे CBSE निकाल आज जाहीर होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे.  राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र, बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी 21 जुलैला शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली होती.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

निकाल कसा जाहीर करणार?

शासन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मधील मूल्यमापन तसेच इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी मध्ये वर्षभरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) सन 2021 चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेत आहे. ही अपवादात्मक परिस्थितीतील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता 12 वी) निकाल तयार करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.

12 वी निकालाची कार्यपद्धती

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्वच उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 12 वीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही. त्यामुळे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. हे करताना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 मधील विषयनिहाय लेखी व तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत. त्यातील तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन यासाठी मंडळाच्या सूचनांप्रमाणे आयोजित परीक्षांमध्ये विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम मूल्यमापनात घेण्यात येणार आहेत.

गुण विभागणी तोंडी/प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भुत आहे.

निकालातील गुणांची विभागणी कशी?

विद्यार्थ्याची इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक , इयत्ता 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व इयत्ता 12 वी चे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील. उपरोक्तप्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी 30 टक्के गुण इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक, 30 टक्के गुण इ. 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व 40 टक्के गुण इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन यानुसार भारांश विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता 10 वी साठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील.

इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.

उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयाने विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार वर्षभर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेले गुण तसेच सदर गुण किती पैकी आहेत सदर विषयासाठी एकूण किती गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले आहे

तोंडी परीक्षा, मुल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचं काय?

विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीत सदर गुणांचे संगणक प्रणालीमधून रूपांतर करून सदर गुण विद्यार्थ्यास संगणक प्रणालीद्वारे प्रदान केले जातील.  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 12 वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे. ज्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन पूर्ण केलेले आहे.

संबंधित बातम्या 

CBSE Class 12 Result 2021 Live Updates : सीबीएसई बोर्ड 12 वी निकाल लाईव्ह अपडेट

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.