Maharashtra HSC Results 2022 Date : बुधावारी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल! निकालाआधीच ‘ही’ कागदपत्र ठेवा तयार

Maharashtra HSC Results 2022 : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार, अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधीच दिली होती.

Maharashtra HSC Results 2022 Date : बुधावारी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल! निकालाआधीच 'ही' कागदपत्र ठेवा तयार
बारावीचा निकाल...
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 3:32 PM

मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (8 जून, दुपारी 1 वाजता) लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Results 2022 Date) याच आठवड्यात लागणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. 8 जून किंवा 9 जून रोजी कोणत्याही क्षणी बारावीचा निकाल (HSC Result Live) लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर 8 जून रोजी हा निकाल लागेल, असं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आधीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्यांची (HSC result News) धाकधूकही वाढली होती. अखेर बुधवारी दुपारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यावेळचा निकाल खास

यावेळचा बारावीचा निकाल जरा खास आहे. 2 वर्ष कोरोना महामारी, दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन. यावेळी मात्र महामारी नंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यानंतर पेपर तपासणीवर बहिष्कार सारख्या बऱ्याच अडचणींना सामोरं जात अखेर ठरलं की बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लावायचा. त्यानुसार बुधवारी निकाल लागणार असून आता पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची सवय सुटली म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकचा वेळ देण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉलेज ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन या कारणांमुळे तर विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली. पण परीक्षाही ऑफलाईन झाल्या आणि आता निकालही कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यताय. कोरोना ही जागतिक समस्या, तिचा जर जगावर परिणाम झालाय तर विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर देखील होणारच. कोरोना सारख्या महामारीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल, राज्यातल्या एकूणच निकालाची परिस्थिती यासाठी हा निकाल खास आहे. या सगळ्याचा मिळून परिणाम पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेशांवर होणार आहे.

निकालानंतर ‘ही’ कागपत्रं आवश्यक

  1. गुणपत्रिका (Board Marksheet)
  2. स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate)
  3. आधार कार्ड (Aadhar card)
  4. जातीचा दाखला (Caste Certificate)
  5. रहिवासी दाखला (Address Proof)
  6. उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)
  7. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  8. पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार, अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधीच दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलंय. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थी आणि पालकांना लाईव्ह पाहायला मिळू शकणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.