दहावीचा निकाल कसा जाहीर करणार? फॉर्म्युला ठरला का? बोर्डानं हायकोर्टात काय सांगितलं?

राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला आहे. SSC Exam

दहावीचा निकाल कसा जाहीर करणार? फॉर्म्युला ठरला का? बोर्डानं हायकोर्टात काय सांगितलं?
Bombay High Court
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 7:25 PM

मुंबई: महाराष्ट्र सरकारनं दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिलला जाहीर केला होता. तेव्हा सीबीएसई बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन निकाल जाहीर करण्याबाबत भूमिका घेऊ, असं म्हटंल होतं. सीबीएसई बोर्डानं दहावीचा निकाल कसा जाहीर करणार याविषयीची नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ निकाल कसा जाहीर करायचा याविषयीचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं उत्तर मुंबई हायकोर्टात प्रा. धनजंय कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिलं. (Maharashtra MSBSHSE board told to Bombay High Court till now no formula final for declaration of SSC Result on plea of Dhananjay Kulkarni)

महाराष्ट्र सरकारच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याविरोधात याचिका

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेतली जाणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ही सुनावणी न्यायमूर्ती एस.जे.कठावाला आणि न्यायमूर्ती एस.पी.तावडे यांच्याबेंचसमोर झाली. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बोर्डासोबत सीबीएसई आणि आयसीएसईच्या निर्णयाला देखील आव्हान दिलं आहे.

जनहित याचिका कुणी दाखल केली?

महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. ही याचिका पुणे येथील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीनं अॅड. उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद केला. प्रत्येक बोर्ड वेगवगेळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करेल. यामुळे अकरावीच्या प्रवेशामध्ये अडचण निर्माण होईल. यामुळे केंद्र सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करुन सर्वांसाठी एक धोरण ठरवावं, असं म्हटलं. यावर केंद्र सरकारच्या वतीनं संदेश पाटील यांनी युक्तिवाद केला. केंद्र सरकारचं फक्त सीबीएसईवर नियंत्रण आहे. आयसीएसई आणि महाराष्ट्र बोर्ड स्वायत्त आहे, आमचं त्यांच्यावर नियंत्रण नाही असं सांगतिलं.

महाराष्ट्र बोर्डाचे वकील काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे वकील किरण गांधी यांनी याचिकाकर्त्यांनी घाई केल्याचं म्हटलं. महाराष्ट्र बोर्डानं अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरवलेला नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे हे बोर्ड ठरवेल आणि फॉर्म्युला राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवेल, असं कोर्टात सांगितलं. आता मुंबई हायकोर्टानं सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसईला त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं आहे. पुढील सुनावणी 19 मे रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Scholarship Exam Postponed:पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा

अकरावी प्रवेशसाठी सीईटी परीक्षा घ्यायची का? दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मत नोंदवण्याचं आवाहन

हेही पाहा:

(Maharashtra MSBSHSE board told to Bombay High Court till now no formula final for declaration of SSC Result on plea of Dhananjay Kulkarni)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.