पुणे : राज्यातील शाळा आजपासून (School starts from today) पुन्हा जोमाने सुरु झाल्यात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं (School Students) जंगी स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुलं देत, त्यांचं स्वागत करण्यात आलं. कोरोना (Corona) महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा वेळेत आणि ऑफलाईन पद्धतीनं नेहमीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थीही सुखावलेत. तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही गेली दोन वर्ष सुरु असलेली वर्च्युअल भेट संपून अखेर प्रत्यक्ष वर्ग आजपासून सुरु झालेत. दरवर्षी 13 जूनपासून शाळा सुरु होता. 13 जूनला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शाळा सुरु होतात. तर 15 जूनपासून प्रत्यक्ष वर्ग भरण्यास सुरुवात होते. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखेर राज्याच्या ग्रामीण भागासह शहरांमधीलही शाळा आजपासून विद्यार्थ्यांनी गजबजल्यात.
विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सजल्यात. कुठे फुलांच्या पायघड्या घातल्या गेल्यात तर कुठे रांगोळी आणि ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आळंय. महत्त्वाचं म्हणजे रेनकोट, खाऊचा डबा, पाण्याची बाटली, दप्तर या सगळ्यासोबत विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरही सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीय. आता शाळेत चैतन्यमय आणि उत्साहवर्धख वातावरण राहावं, यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी म्हटलंय.
The joy of covering books with brown paper,polishing the canvas shoes,shopping for the latest style raincoat,sharing stories of summer vacation on the first day -all this was lost for two years. It is time to do all this again as we go #BacktoSchool.
Welcome back, champions! pic.twitter.com/K4xCAvbrdl
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 14, 2022
राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं पुरवण्यात आली असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. तसंच 82 हजारपेक्षा जास्त शाळांमधून पाच कोटी 38 लाखपेक्षा जास्त पुस्तकांचं वितरणही करण्यात आलंय. तर झेडपी शाळेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश देखील खरेदी करण्यात आलेत.
वाढलेली महागाई आणि इंधनदरांमुळे स्कूल बसचं शुल्कही महागलंय. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना आता बेस्ट बसचा हक्काचा पर्याय असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर, बेस्ट प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांसाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसे निर्देश वाहक आणि चालकांना देण्यात आलेत. स्कूल बस महागल्यानं शालेय विद्यार्थी बेस्ट बसवर अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विद्यार्थ्यांची खास काळजी घेण्याचा यावेळी असे आदेश बेस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेत. त्याचप्रमाणे जादा बसेसची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.
विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. विदर्भातील शाळा या 27 जूनपासून सुरु होणार आहे. विदर्भातील शाळांच्या तारखेबाबत शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या असून विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.