HSC SSC Result : दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता, नेमकं कारण काय ?

| Updated on: Jun 08, 2022 | 1:39 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा घेण्यात येत आहेत. अनेक अडचणींनतर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात येत आहे.

HSC SSC Result : दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता,  नेमकं कारण काय ?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: File Photo
Follow us on

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा घेण्यात येत आहेत. अनेक अडचणींनतर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन निश्चित होत असताना आणखी एक नवी अडचण उभी राहिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल (SSC HSC Result) रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काय मार्ग काढला जाणार हे पाहावं लागणार आहे.

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचा बहिष्कार

राज्यात शिक्षण विभागानं विनाअनुदानित तत्त्वावर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. त्यानंतर विनाअनुदानित शाळांना काही प्रमाणात अनुदान देण्यास सुरुवात केली. विनाअनुदानित शाळातील शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्यानं त्यांनी वेतन आणि इतर मागण्यांसाठी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. विनाअनुदानित शाळांमधील जवळपास 30 हजार शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टकाल आहे. यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उत्तर पत्रिका तपासणी विना पडून

राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. राज्यातील 30 हजार शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीला नकार दिला आहे. यामुळं 1200 गठ्ठे तपासणीविना पडून राहणार आहेत.

दहावीच्या परीक्षा सुरु

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येत आहेत. मंडळाकडे दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत.  बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरूवात होणार आहे. ही परिक्षा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार आहेत.

इतर बातम्या:

Aurangabad | नव्या जलनाहिनीसाठी ‘समांतर’च्या अर्धवट कामाचे पाईप काढणार, पाणी योजनेचे काम कुठपर्यंत?

Goa CM Oath Taking Ceremony: हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत… देवाचो सोपूत घेता की… सावंत यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ