मुंबई: कोरोना विषाणू संसर्ग झाल्यापासून महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. (Maharashtra State Education research and Training council make compulsory completion of bridge course for class 2 to 8)
महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचं सावट आहे. गेल्या वर्षीपासून विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्षभराच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात किती कौशल्य विकसित केले आहेत. याची चाचणी ब्रीज कोर्समधून घेतली जाणार आहे.
एखादा विद्यार्थ्यी चौथीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असेल तर त्याला शाळा सुरु झाल्यानंतर पहिले 45 दिवस तिसरीचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. यामध्ये सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची उजळणी करुन घेतली जाईल. 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावरील पेपर द्यावा लागेल . हा पेपर गेल्या वर्षीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यातून विद्यार्थ्यानं किती कौशल्य प्राप्त केली आहेत, याची चाचणी घेतली जाईल. ब्रीज कोर्स शाळा सुरु झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे.
ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्यानं गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार आहे. तर, सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची ब्रीज कोर्सच्या माध्यमातून तयारी करुन घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ब्रीज कोर्स महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना अनिवार्य केला आहे. महाराष्ट्रातील सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या शाळांना हा निर्णय लागू नसेल. दुसरी ते आठवीच्या वर्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रीज कोर्समधून विद्यार्थ्यांची पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकण्याची क्षमता देखील जाणून घेतली जाणार आहे.
मुंबई मनपाकडून खासगी लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत किती?https://t.co/bA0htmzNTO#bmc | #mumbai | #VaccinationDrive | #CoronaSecondWave | #coronainmumbai | #VaccinationDrive | #CovishieldVaccine | #Covaxin | #SputnikV
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2021
संबंधित बातम्या:
SET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
(Maharashtra State Education research and Training council make compulsory completion of bridge course for class 2 to 8