Talathi Exam : तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल, पेपरची वेळ बदलली, वाचा सविस्तर…

Talathi Exam Server Down Paper Time Change : तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल, पेपरची वेळ बदलली, वाचा सविस्तर...

Talathi Exam : तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल, पेपरची वेळ बदलली, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 12:05 PM

पुणे | 21 ऑगस्ट 2023 : तलाठीपदाच्या परीक्षेबाबत महत्वाची बातमी… भरती परिक्षेआधी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परिक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. तलाठी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर ताटकळत थांबावं लागलं. आता या परिक्षेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.  तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावले आहेत.

तलाठीपदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय आहे. मागचे कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी या तलाठी भरती परिक्षेची तयारी केली. आपण मेहनत केल्यास आपल्या यश पदरी पडेल, असं या विद्यार्थ्यांना वाटत होतं. कालपर्यंत या परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आज परिक्षा केंद्रावर पोहोचले. कारण आज सकाळी नऊ वाजता पेपर होणार होता. पण परिक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थ्यांच्या पदरी पडली ती निराशा… कारण सर्व्हर डाऊन असल्याने परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता.

संपूर्ण राज्यामध्ये विविध परीक्षा केंद्रावर ही आज तलाठी भरतीची परीक्षा होतेय. परिक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती होती. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं आहे. फक्त नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती होती.

अमरावतीत तलाठी पदाची परीक्षा अखेर सुरू झाली आहे. सकाळपासून सर्वर डाऊन असल्याने वेळेवर परीक्षा सुरू न झाल्याने केंद्रावर गोंधळ होता. राज्यभरातून परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थी अमरावतीत आले आहे. सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र, सर्वर डाऊन मुळे विद्यार्थ्यांना 10 वाजता परिक्षा केंद्रात सोडण्यात आले.. 10.30 वाजता परीक्षा सुरू झाली. यानंतर आज दुपारी 12.30 वाजता एक पेपर होणार होता. मात्र पण पहिला पेपर उशीर झाल्याने दुपारचं वेळापत्रक कोलमडलं आहे. या पेपरच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे.

आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात काही काळंबेरं तर नाही ना? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.