मुंबई : एमएचटी सीईटी (MHT-CET) परीक्षा पुढे ढकलण्यात आलीये. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही माहिती ट्विटरवरून दिलीये. नीट 2022 आणि जेईई मेन्स 2022 परीक्षेमुळे महाराष्ट्र सीईटी परीक्षा (एमएचटी सीईटी 2022) पुढे ढकलण्यात आली असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय. लवकरच महाराष्ट्र सीईटीच्या नव्या तारखा (Updated Dates) जाहीर होणार आहेत. जेईई आणि नीट परीक्षेमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात घेण्यात येणार आहेत. अद्याप तारखा जाहीर झालेल्या नाहीत त्या लवकरच होतील. यापूर्वी एमएचटी सीईटी 2022 11 जून ते 16 जून दरम्यान होणार होती.
JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल.. तारखा लवकरच जाहीर करू.
— Uday Samant (@samant_uday) April 21, 2022
जेईई मेन्स सत्र एक परीक्षा 29 जून रोजी संपणार आहे. जेईई मेन्स सत्र दोनची परीक्षा 30 जुलै 2022 रोजी संपणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट युजी 2022 परीक्षा 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. या प्रमुख स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर 2022-23 च्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेसाठी वेगळा संघर्ष करावा लागू नये यासाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. जेईई आणि नीट परीक्षा देशभरातील सर्वच विद्यार्थी देतात या परीक्षांच्या मध्ये विद्यार्थ्यांना अन्य परीक्षा द्याव्या लागू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
एमएचटी सीईटी 2022 परीक्षा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नोंदणी ३१ मार्च रोजी संपलीये. नीट जेईई परीक्षेमुळे देशातील बरेच विद्यार्थी इतर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.
इतर बातम्या :