JEE Main 2023 : नागपूरच्या मृणाल श्रीकांतचा जेईईत डंका, मृणालच्या यशामागचे रहस्य काय?

मृणाल एनटीएसई, आरएमओ आणि केमेस्ट्री ऑलिम्पियडही क्वालिफाईड आहे. याशिवाय केव्हीपीवाय एसएम स्ट्रीममध्ये ऑल इंडिया ८७ रँक मिळवली.

JEE Main 2023 : नागपूरच्या मृणाल श्रीकांतचा जेईईत डंका, मृणालच्या यशामागचे रहस्य काय?
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 2:37 PM

मुंबई : नागपूरच्या मृणाल श्रीकांत याने जेईई मेन्समध्ये (JEE Main 2023) देशात तिसरी रँक मिळवली. मृणाल गेल्या दोन वर्षांपासून एका खासगी इंस्टिट्यूट मध्ये नियमित विद्यार्थी होता. मृणालने दहावीत ९८.४ टक्के गुण प्राप्त केले. जेईई मेन जानेवारी २०२३ मध्ये ९९.९६ स्कोअर केला होता. यावेळी त्याने ३०० पैकी ३०० गुण मिळवून १०० पर्सेंटाईल मिळवलेत. मृणाल एनटीएसई, आरएमओ आणि केमेस्ट्री ऑलिम्पियडही क्वालिफाईड आहे. याशिवाय केव्हीपीवाय एसएम स्ट्रीममध्ये ऑल इंडिया ८७ रँक मिळवली. यंदाच मृणालने बारावीची परीक्षा दिली. बारावीचे निकाल अद्याप यायचे आहेत.

शिक्षकांच्या गाईडलाईनचे पालन

मृणालने सांगितले की, जेईई मेन आणि एडवान्सच्या तयारीसाठी शिक्षकांच्या गाईडलाईनचे पालन करत आहे. कारण शिक्षकांन या परीक्षांचा बराच अनुभव आहे. त्यामुळे शिक्षकांची गाईडलाईन तसेच स्टडी मटेरीअल याशिवाय कुठंही अवांतर अभ्यासाची गरज नाही.

जेईई मेनमध्ये असे मिळाले यश

जेईई मेन प्रामुख्याने एनसीईआरटी सिलॅबसवर फोकस असते. शेवटच्या क्षणी नोट्सची बेसिक रिव्हीजन केली होती. आठवडी चाचणीत (टेस्ट) गुण कमी-जास्त होत असतात. परंतु, मी चाचणी परीक्षा देत असे, असं मृणाल म्हणाला.

हे सुद्धा वाचा

टेस्ट झाल्यानंतर सेल्फ अनालिसीस करत होतो. कोणत्या चुकांमुळे गुण कमी मिळाले, हे पाहत होतो. पुढील टेस्टमध्ये या चुका होऊ नये, यावर फोकस असायचा. सध्या जेईई एडव्हान्सच्या तयारीला लागलो आहे.

पहिल्या ५० मध्ये रँक मिळवण्याचा प्रयत्न राहील. कारण मला आयआयटी मुंबईच्या सीएस ब्राँचमधून बीटेक करायचे असल्याचं मृणाल श्रीकांत याने सांगितले.

विद्यार्थी जेईई मेन्सचा रिझल्ट तपासू शकतात. त्यासाठी त्यांना जेईई मेनच्या अधिकृत बेवसाईटवर जावं लागेल. मेन क्वालिफाईड करणारे विद्यार्थी हे जेईई एडव्हान्स येऊ शकतात. त्यानंतर त्यांना आयआयटी सारख्या नामांकित संस्थांमध्ये शिक्षण्याची संधी मिळते.

लाखो विद्यार्थी जेईईची तयारी करतात. देशपातळीवर ही परीक्षा होत असल्यामुळे खूप स्पर्धा असते. अशात नागपूरच्या मृणाल श्रीकांत याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशपातळीवर तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मृणालचे कौतुक केले जात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.