मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांने मार्च 2023 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेतली होती. या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता परीक्षा मंडळाची पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्याचा एकूण निकाल जाहीर करण्यात आला होता. पत्रकार परिषदेत राज्याचा एकूण निकाल, मंडळ निहाय निकाल जाहीर केला. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. त्याची माहितीही देण्यात आली आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतची प्रिंट काढून घेता येणार आहे.
राज्यातील महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर
राज्यातील तब्बल 151 गुणवंत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क
लातूरमधून सर्वाधिक तर कोकणातून सर्वात कमी विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
विभागनिहाय 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी
लातूर | 108 विद्यार्थी
औरंगाबाद | 22 विद्यार्थी
अमरावती | 7 विद्यार्थी
मुंबई | 6 विद्यार्थी
पुणे | 5 विद्यार्थी
कोकण | 3 विद्यार्थी
बारावीनंतर आज दहावीचा निकाल जाहीर
हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेचा 10 वीचा निकाल 97.95 टक्के
उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचं अभिनंदन,
डॉक्टर प्रकाश आमटे यांची फेसबूक पोस्ट
परिस्थितीमुळे अर्धवट सोडावं लागलं होत शिक्षण,
वयाच्या 60 व्या वर्षी 10 वीची परीक्षा देत 50 % गुण मिळवत शीतल अमराळे झाल्या परीक्षा उत्तीर्ण
शिक्षण अपूर्ण राहिल्याची मनात होती खंत,
त्यामुळे 27 वर्ष मेहनत करत यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्यानंतर, 60 व्या वर्षी दिली 10 वी परीक्षा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. एक महिन्यापासून मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान मोदी गप्प आहेत आणि अमित शहा सांगत आहेत की सर्वकाही ठीक आहे. याशिवाय कुस्तीपटू आणि गौतम अदानी यांच्या संपावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर, ९३. ८३ टक्के निकाल लागला…
बारावी प्रमाणे दहावीतही राज्यात कोकण विभागाने मारली बाजी
कोकण विभागाचा ९८.११ टक्के निकाल
दहावीचे ऑनलाईन निकाल लागले…
१४ जून रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून मिळणार ओरिजनल मार्कशिट
राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
परभणी जिल्ह्यात एकण 27 हजार 558 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
त्यापैकी 24 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी 90.45 इतकी
जिल्ह्यातील 7 हजार 496 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 8 हजार 601 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 6 हजार 586 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
14 हजार 820 मुलांनी परीक्षा दिली होती, यातील 12 हजार 996 मुले उत्तीर्ण
तसेच 12 हजार 388 मुलींनी परिक्षा दिली होती, यातील 11 हजार 615 मुली दहावीची परीक्षा उत्तीर्ण
गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 92.52 %टक्के
पहिल्या क्रमांकावर गोंदिया तर दुसऱ्या क्रमांकावर भंडारा
दहावीच्या निकालानंतर पुण्यात जल्लोष
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष
ढोल वाजवत, ठेका धरत,पेढे वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष
निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह
मराठवाड्यात बीड जिल्हा प्रथम, औरंगाबाद जिल्हा द्वितीय तर जालना तृतीय क्रमांकावर
मराठवाडा विभागात पुन्हा मुलींनी मारली बाजी
10 वी परीक्षेत 104 गैरप्रकार आले होते समोर
गैरप्रकारांमुळे 89 विद्यार्थ्यांची संपादणूक केली रद्द
विभागातील 9 शाळांचा निकाल 0 %
नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावतीच्या निकाला यंदा काहीसा चांगला लागलाय
गेल्या वर्षी ९६.८१ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सातव्या स्थानी होता तो यंदा सहाव्या स्थानावर
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच मारली अमरावतीत बाजी
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा 93.83 टक्के निकाल
100% गुण मिळवण्याचा यादीत शिक्षणाचं माहेरघर पडलं मागे
दहावीच्या परीक्षेमध्ये 23 विद्यार्थी तृतीय पंथी प्रवर्गातून बसले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष
ढोल वाजवत, ढोलाच्या तालावर ठेका धरत पेढे वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष
निकालानंतर विद्यार्थ्यांच्यात प्रचंड उत्साह
दहावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचे दिसतंय
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीप्रमाणे दहावीचं निकालाचा टक्काही घसरला
मागील वर्षी महाराष्ट्राचा निकाल ९६. ९४ टक्के लागला होता तर यंदाचा निकाल ९३.८० टक्के लागलाय
इयत्ता दहावीत एकूण 4,89,455 विद्यार्थ्यांनी 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
तर 5,26,210 विद्यार्थाी फर्स्ट क्लासममध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
3,34,015 विद्यार्थ्यांना सेकंड क्लास आणि 85,298 विद्यार्थ्यांना थर्ड क्लास मिळाला आहे.
फेब्रुवारी/मार्च 2013 पासून उत्तरपत्रिकेची संपूर्ण पुनर्तपासणी उपलब्ध
असे करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम उत्तरपत्रिकेच्या प्रतींसाठी करावा लागेल अर्ज
उत्तरपत्रिका मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत विहित शुल्कासह करू शकतात ऑनलाइन अर्ज
शाळा किंवा विभागीय मंडळ कार्यालयातून मिळू शकतो अतिरिक्त तपशील
10 वीच्या निकालातील ठळक मुद्दे
एकूण विद्यार्थी: 15,29,096
उत्तीर्ण: 14,34,893
कोकण विभाग (98.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण)
नागपूर विभाग (92.5 टक्के उत्तीर्ण)
मुंबई विभागाचा निकाल : 93.66 टक्के
100 टक्के निकाल शाळा: 10,000
महाराष्ट्रातील दहावीच्या निकालात गेल्या 5 वर्षांत उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली
2023- 93.83
2022- 96.94
2021- 99.95
2020- 95.30 (कोरोना महामारीच्या आधी)
एकूण 151 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले, पहा यादी..
लातूर- 108
औरंगाबाद- 22
अमरावती- 7
मुंबई- 6
पुणे- 5
कोकण- 3
या वर्षी, एकूण 15,29,096 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून दहावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 14,34,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागनिहाय निकालाचा विचार करता, कोकण विभागाने बाजी मारली आहे.
एकूण 23013 शाळांपैकी 6844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामगिरी सरस ठरली आहे.
मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल तपासू शकता-
दहावीच्या निकालात दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२. ४९ टक्के असल्याची माहिती समोर…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली माहिती
Maharashtra Board SSC 10th Result : यंदा 10 वीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 29 हजार 96 इतके विद्यार्थी बसले होते. त्यातून किती मुलं पास झाली जाणून घ्या सर्वकाही. वाचा सविस्तर….
कोकण – 98.11%
पुणे – 95.64%
मुंबई – 93.66%
औरंगाबाद – 93.23%
नाशिक – 92.22%
कोल्हापूर – 96.73%
अमरावती – 93.22%
लातूर – 92.66%
नागपूर – 92.05%
महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा 93.83 % इतका निकाल
मुलींचा निकाल 95.87 टक्के, मुलांचा निकाल 92.05 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी
नागपूर विभाग सर्वात शेवटी
कोकण विभागाचा 98.11 टक्के निकाल
मुलांच्या तुलनेत मुलींची निकालात बाजी
पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण
दिव्यांग श्रेणीत 92.49 टक्के निकाल
इयत्ता 10 वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली.
महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेसाठी एकूण 15,77,256 उमेदवारांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी 3,54,493 एकट्या मुंबई विभागातील होते.
संपूर्ण महाराष्ट्रात एसएससी परीक्षेसाठी एकूण 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींचा समावेश आहे.
एकूण ५,०३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ आज इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र बोर्ड त्यांच्या पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा
त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका
निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल
मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या
त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे
राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती
ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती
यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती.