मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्या काळात शिक्षक पात्रता परिक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी केलेला गैरव्यवहार उघडकीस आला आहे. टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी टीईटीची प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. 2018 नंतरच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर 2013 नंतर झालेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या उपाध्यक्षा शैलजा दराडे यांनी शिक्षण विभागाला टीईटीच्या बोगस प्रमाणपत्राचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील 601 प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झालीये, आणि त्यामध्ये 6 प्रमाणपत्र बोगस आढळून आलीत.
2018 सालीही प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली होती. आता परत एकदा प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्यानं सगळ्यांचेच धाबे दणाणले असल्याची माहिती आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील 201 शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र जमा केली आहेत. बोगस प्रमाणपत्र असल्यास कारवाई होणार असल्याची माहिती आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर 2013 पासून लागलेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रामाणपत्राची पडताळणी होणार आहे.
राज्यात पैसे देऊन टीईटी परीक्षेमद्ये उत्तीर्ण करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागानं पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गैरमार्गाचा वापर करत टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नियुक्ती अनुदानित शाळांमध्ये झाल्याचा शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळं सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे.
इतर बातम्या:
टीईटी परीक्षेदरम्यान ब्ल्यूटुथ वापरल्याचा आरोप, गोंदियात विद्यार्थिनीविरोधात परीक्षार्थी आक्रमक
प्रीतिश देशमुखच्या घरी पोलीस भरतीची हॉल तिकीट; आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी समोर
MSEC decided to start verification of TET certificate of teachers who join service from 2013