Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 8 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, पालकांना प्रथमच संधी
परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) कार्यक्रमासाठी 8.6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) कार्यक्रमासाठी 8.6 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.25 लाखांहून अधिक शिक्षकांनी तर 78,000 पालकांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असल्यास त्यांनी innovateindia.mygov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14 मार्च आहे. (Narendra Modi Pariksha Pe Charcha 2021 know how register full details)
परीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होत?
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे यंदाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. 16 फेब्रुवारी 2018 ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.
प्रकाश जावडेकरांकडून परीक्षा पे चर्चाची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुन्हा ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. जावडेकर यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘koo’ वरून यासंबंधी माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा 2021 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील.
जावडेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘अखेर प्रतिक्षा संपली! परीक्षा पे चर्चा 2021, प्रेरणादायी कार्यक्रमातून नरेंद्र मोदी पुन्हा आले आहेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे. त्यांच्याशी संवाद साधा, परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांच्याकडून मंत्र जाणून घ्या. ते फक्त परीक्षेत मदतच नाही तर आयुष्यावरही मार्गदर्शन करतील.’ असं म्हटलं होतं.
PM Kisan Scheme: ठरलं ! पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणारhttps://t.co/tHR1Ornd28#NarendraModi | #pmkisan | #kisansanmaan | #farmerprotest
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
संबंधित बातम्या:
प्राण गमावलेल्या 2 कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत
मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश
(Narendra Modi Pariksha Pe Charcha 2021 know how register full details)