Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षा नियोजित वेळेतचं होणार, परीक्षेसाठी शेवटचं रिव्हिजन सुरू करण्याचा बोर्डाचा सल्ला

21 मे रोजी होणार्‍या पदव्युत्तर शिक्षणासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2022) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन (AIMSA) ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षा नियोजित वेळेतचं होणार, परीक्षेसाठी शेवटचं रिव्हिजन सुरू करण्याचा बोर्डाचा सल्ला
नीट पीजी परीक्षा नियोजित वेळेतचं होणारImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 8:27 AM

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून (Student) होत आहे. तसेच विद्यार्थी अनेक दिवसांपासून ट्विटरवर (Twitter) परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती देखीव करीत आहेत. परंतु त्यांच्या ट्विटर विनंतीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच त्यांची दखल सुध्दा घेतलेली नाही. आता विद्यार्थ्यांनी मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यामुळे परीक्षेच्या आगोदर काय होणार हे पाहावं लागणार आहे. परीक्षा 9 जुलैला होणार असा मेसेज विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. परंतु तो मॅसेज खरा नसून ठरलेल्या वेळेत परीक्षा होणार असल्याचे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने जाहीर केलं आहे.

परिक्षेची तारीख फायनल

21 मे रोजी होणार्‍या पदव्युत्तर शिक्षणासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2022) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन (AIMSA) ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षा वेळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा वेळेत होईल. NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना आता या PG अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी शेवटचं रिव्हिजन सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ती पुढे ढकलण्याचा ट्रेंड चालवण्यात आला होता. पण विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 30 एप्रिलला झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडून याचिका दाखल

संदीप एस तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. संदीप एस तिवारी यांनी ट्विट केले आणि लिहिले, “ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने, आम्ही 21 मे 2022 रोजी होणार्‍या नीट पीजी 2022 परीक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आपला मुद्दा मांडला आहे. NEET PG 2021 साठी सुरू असलेल्या समुपदेशनासह परीक्षेच्या तारखांच्या संघर्षामुळे उमेदवारांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.