NEET UG Admit Card 2022: परीक्षा 17 तारखेलाच, ॲडमिट कार्ड एका क्लिकवर! अडचण असल्यास इथे संपर्क साधा

| Updated on: Jul 12, 2022 | 7:04 AM

NEET UG Admit Card 2022: तुम्हाला तुमचे NEET प्रवेशपत्र न मिळाल्यास किंवा डाउनलोड करताना कोणतीही समस्या आल्यास, तुम्ही थेट NTA शी संपर्क साधू शकता. कसा आणि कुठे संपर्क करणार?

NEET UG Admit Card 2022: परीक्षा 17 तारखेलाच, ॲडमिट कार्ड एका क्लिकवर! अडचण असल्यास इथे संपर्क साधा
NEET PG Counselling
Image Credit source: Social Media
Follow us on

NEET UG 2022: देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical Entrance Exam) घेतली जाणारी नीट परीक्षेच्या तारखेला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. ट्विटर वर आंदोलनं केली. ट्विटर वर तर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा पुढे ढकला अशी मागणी करत हॅशटॅग चालवलं. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊन सुद्धा एनटीए कडून सिटी स्लिप जारी करण्यात आली. त्याचवेळी नीट परीक्षा (NEET Exam) वेळेतच घेतली जाईल असा अंदाज लावला जात होता. शेवटी वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा 17 तारखेला घेण्यात येणार आहे. आजपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट (NEET UG Online Hallticket) मिळणार आहे. साधारण 18 लाख विद्यार्थी हे नीटची परीक्षा देत असतात. देशातील 546 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 17 तारखेला दुपारी 2 ते 5.20 या वेळेत ही परीक्षा पार पडेल.अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

कोणतीही समस्या आल्यास

यंदा NEET परीक्षेसाठी एकूण 18,72,341 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) रविवार, 17 जुलै 2022 रोजी दुपारी 2 ते 5.20 या वेळेत NEET UG परीक्षा आयोजित करेल. ही परीक्षा देशभरातील एकूण 546 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. तुम्हाला तुमचे NEET प्रवेशपत्र न मिळाल्यास किंवा डाउनलोड करताना कोणतीही समस्या आल्यास, तुम्ही थेट

  • NTA शी संपर्क साधू शकता.
  • यासाठी तुम्ही 011-40759000 वर कॉल करू शकता.
  • किंवा neet@nta.ac.in किंवा neet@nta.ac.in वर ईमेल पाठवून संपर्क साधू शकता.

NEET UG प्रवेशपत्र 2022 डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

NEET UG पुढे ढकलण्याची मागणी का?

NEET परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासून ती पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिली म्हणजे CBSE 12वी बोर्डाच्या परीक्षा 15 जून रोजी संपल्या. अशा परिस्थितीत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की त्यांच्याकडे NEET च्या तयारीसाठी फक्त एक महिना वेळ मिळाला. दुसरे कारण म्हणजे CUET UG CUET 2022 ची परीक्षा 12वी नंतर UG अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 15 जुलैपासून सुरू होत आहे. या तारखेच्या संघर्षामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यांना दोनपैकी एक परीक्षा निवडावी लागेल. या कारणांमुळे लाखो उमेदवार NEET UG 2022 परीक्षेची तारीख 40 दिवसांनी वाढवण्याची मागणी करत होते.