NEET UG Counselling 2021 नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी नीट यूजी परीक्षा समुपदेशन कार्यक्रम जाहीर केला होता. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणं वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठीच्या समुपदेशनास उद्या (19 जानेवारी) पासून होणार आहे. वैद्यकीय समुपदेशन कमिटी (Medical Counselling Committee) यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी परीक्षेसाठी अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागांवर ऑनलाइन समुपदेशन सुरु करेल. विद्यार्थी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकतात.
नीट यूजी राज्य कोट्याअंतर्गत 192 मेडिकल कॉलेजमध्ये 23 हजार 378 एमबीबीएसच्या जागा उपलब्ध आहेत. तर, 272 सरकारी कॉलेजेसमध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या 41 हजार 388 आहे. एमबीबीएस साठी 83 हजार 75 बीडीएससाठी 26 हजार 949 आयुष्यासाठी 52 हजार 720 आणि बीवीएससी आणि एएचसाठी 603 एम्ससाठी 1899 जिपमर साठी 249 अशा जागा उपलब्ध आहेत. तर, समुपदेशनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mcc.nic.in या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. समुपदेशनामध्ये होत असलेल्या उशिरा मुळे डॉक्टर्स नाराज होते. सुप्रीम कोर्टानं या संबंधी दिशानिर्देश दिल्यानंतर समुपदेशनातील येणाऱ्या अडचणी दूर झाल्या त्यानंतर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट पीजी कौन्सिलिंग च्या तारखा जाहीर केल्या आहेत.
NEET-UG counseling to begin from January 19: Union Health Minister Mansukh Mandaviya
Schedule as follows: pic.twitter.com/zllKWmXInm
— ANI (@ANI) January 13, 2022
स्लॉट क्रमांक. 1 :
ऑनलाईन नोंदणी 19 जानेवारी ते 24 जानेवारी
पसंतीक्रम निश्चिती : 20 जानेवारी ते 24 जानेवारी
विद्यापीठ आणि संस्थाकडून पडताळणी : 25 आणि 26 जानेवारी
सीट अलॉटमेंट प्रोसेस : 27 आणि 28 जानेवारी
निकाल : 29 जानेवारी
रिपोर्टिंग : 30 जानेवारी
स्लॉट क्रमांक. 2 :
ऑनलाईन नोंदणी : 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी
पसंतीक्रम निश्चिती : 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी
विद्यापीठ आणि संस्थाकडून पडताळणी : 15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी
सीट अलॉटमेंट प्रोसेस : 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी
निकाल : 19 फेब्रुवारी
रिपोर्टिंग : 20 फेब्रुवारी
स्लॉट क्रमांक. 3 :
ऑनलाईन नोंदणी : 2 मार्च ते 7 मार्च
पसंतीक्रम निश्चिती : 3 मार्च ते 7 मार्च
विद्यापीठ आणि संस्थाकडून पडताळणी : 8 मार्च ते 9 मार्च
सीट अलॉटमेंट प्रोसेस : 10 मार्च ते 11 मार्च
निकाल : 12 मार्च
रिपोर्टिंग : 13 मार्च
नीट यूजी समुपदेशनाची चौछी विशेष फेरी 21 ते 26 मार्च या कालावधीत घेतली जाईल.
इतर बातम्या:
धनुषची रजनीकांतच्या लेकीला सोडचिठ्ठी, पण सोशल मीडियावर चर्चा श्रुती हसनची!, पाहा नेमकं कारण काय..?
Mumbai | Nana Patole यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली
NEET UG Counselling 2021 to begin from January 19 NEET UG Registration And Counselling