बारावीच्या परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची नरेंद्र मोदींकडे मागणी, निकालाचा फॉर्म्युलाही सांगितला
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण केल्याशिवाय परीक्षा घेऊ नये, अशी भूमिका मांडली. Arvind Kejriwal class 12th exam

नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. बारावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या चिंतेत आहेत. पालकांची आणि विद्यार्थ्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये लसीकरणा शिवाय बारावीची परीक्षा होऊ नये, अशी अपेक्षा असं मत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. (New Delhi CM Arvind Kejriwal tweet and demanding cancel class 12th exam before PM Narendra Modi meeting)
अरविंद केजरीवाल यांचे ट्विट
केजरीवाल यांनी ट्विट करत केंद्र सरकारकडे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे यंदादेखील पास पास केलं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे. 23 मे रोजी झालेल्या बैठकीत नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली होती.
12वीं की परीक्षा को लेकर बच्चे और पेरंट्स काफ़ी चिंतित हैं। वे चाहते हैं कि बिना वैक्सिनेशन, 12वी की परीक्षा नहीं होनी चाहिए
मेरी केंद्र सरकार से अपील है कि 12वीं की परीक्षा रद्द की जाए। पिछले performance के आधार पर उन्हें आँकलन किया जाए।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 1, 2021
सीबीएसईकडून दहावीची परीक्षा रद्द
देशातील वाढत्या संख्येचा पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 14 एप्रिल 2019 रोजी घेतला होता. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकून 1 जून रोजी आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आलं होतं. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली रमेश पोखरियाल निशंक यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री शिक्षण सचिव यांनी त्यांची मते मांडली होती.
सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका
देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर अॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट या संदर्भात गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागून घेतला होता.
संबंधित बातम्या:
(New Delhi CM Arvind Kejriwal tweet and demanding cancel class 12th exam before PM Narendra Modi meeting)