NIFT Result 2021 : निफ्ट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, थेट लिंकद्वारे तपासा
संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यासाठी लेखी प्रवेश परीक्षा 14 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) कडे देशभरात 17 कॅम्पस आहेत. (NIFT exam result announced on link, check on nift.ac.in)
नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी(NIFT)ने लेखी प्रवेश परीक्षेचा निकाल (NIFT Result 2021) जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट nift.ac.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. या लेखी परीक्षा (NIFT Exam 2021) 14 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली होती. (NIFT exam result announced on link, check on nift.ac.in)
एकूण 32 शहरांत घेतल्या परीक्षा
निफ्ट प्रवेश परीक्षे(NIFT Entrance Exam)साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली होती. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी होती. संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यासाठी लेखी प्रवेश परीक्षा 14 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) कडे देशभरात 17 कॅम्पस आहेत. यासाठी एकूण 32 शहरांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.
असा तपासा निकाल
NIFT प्रवेश परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुकरण करा.
सर्वात आधी अधिकृत वेबसाईट nift.ac.in वर जा. वेबसाईटवर Result of Written Exam – B.Des./M.Des./MFT/MFM Program लिंक वर क्लिक करा. आता लॉग इन करण्यास सांगितले जाईल. येथे आपला रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि अॅप्लिकेशन नंबरच्या मदतीने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपला निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढा. या डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन निकाल तपासू शकता.
उत्तर पत्रिका
ज्या उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या लेखी प्रवेश परीक्षेत भाग घेतला होता, त्यांच्यासाठी आधीपासूनच उत्तर-की वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करुन त्यांची उत्तर पत्रिका मिळवू शकतात.
सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट nift.ac.in वर जा. वेबसाईटच्या होमपेजवर 14 फेब्रुवारी रोजी लिंक वर आयोजित उत्तर पत्रिका लिखित परीक्षा (GAT) वर क्लिक करा. वेबसाईटवर कोर्स, प्रश्न पत्र कोड आणि जन्म तारीख टाका. आता तुमची उत्तर पत्रिका स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही उत्तर पत्रिका डाउनलोड करु शकता. (NIFT exam result announced on link, check on nift.ac.in)
INI CET July 2021 Date: जुलैच्या सत्रासाठी आयएनआय सीईटी तारखेची घोषणा, अधिकृत वेबसाईटवर जाणून घ्या माहितीhttps://t.co/VCFAo4oyvr#INICET |#july |#session |#date |#announced |#website
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2021
इतर बातम्या
फडणवीसांनी या गुन्ह्यातील सीडीआरची माहिती तपास यंत्रणांना का दिली नाही? सचिन सावंत यांचा सवाल
NIA की ATS? फडणवीसच संभ्रमात?; हिरेन मृत्यू प्रकरणात दिल्लीत मोठी मागणी