बेंगळूर : कर्नाटकची (Karnatak) राजधानी बेंगळूरमधील काही प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सकाळच्या प्रार्थना सभेत राष्ट्रगीत गाण्यास टाळाटाळ केल्याची माहिती दिली आहे. अशा प्रकरणांच्या तक्रारी वारंवार येत होत्या. याच कारणामुळे कर्नाटक सरकार आता यावर लक्ष देत आहे. कर्नाटकच्या शालेय शिक्षण (Education) आणि साक्षरता विभागाने एक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये शाळांमध्ये आता सकाळच्या सभेत राष्ट्रगीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता सर्व शाळांना सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गायचे आहे, जेणेकरून नियमाचे पालन करता येईल. एका विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांना तक्रार करण्यात आली होती की, बंगळुरूमधील काही खासगी शाळा सकाळच्या असेंब्लीदरम्यान राष्ट्रगीत गाण्याच्या मानक प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत. “काही शाळा राष्ट्रगीत (National Anthem) म्हणण्यास टाळाटाळ करतात आणि काही आठवड्यांत फक्त दोनदाच गाणे गात आहेत,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.
उपसंचालक सार्वजनिक शिक्षण (डीडीपीआय) च्या अधिकाऱ्यांनाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना भेट देण्याचे काम देण्यात आले आहे. सकाळच्या संमेलनादरम्यान जागेची कमतरता भासल्यास विद्यार्थी आपल्या वर्गात राष्ट्रगीत गाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे. बेंगळूर उत्तरचे डीडीपीआय लोहिताश्व रेड्डी म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी राष्ट्रगीत गात नव्हते, अशा शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आता, त्यांनी आश्वासन दिले आहे की ते नियमितपणे राष्ट्रगीत गातील.”
कर्नाटकात सध्या आधीच राष्ट्रगीत आणि देशभक्तीवरून वाद सुरू आहे. अलीकडे सावरकरांच्या चित्रावरून वाद निर्माण झाला होता. कर्नाटकातील तुमकुरू येथे सावरकरांचे पोस्टर फाडण्यात आले. या घटनेपूर्वी शिवमोगामधील सावरकरांचे चित्रही वादाचे कारण बनले होते