IIT वा NIT नव्हे, या युनिव्हर्सिटीच्या मुलींना 21-21 लाखांचे पॅकेज
आयआयटी किंवा एनआयटीतून बीटेक केल्यावरच चांगले तगडे पॅकेज मिळते असे नाही उत्तर प्रदेशातील या युनिव्हर्सिटीतून बीटेक केलेल्या मुलींना 21-21 लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
उत्तर प्रदेश | 5 ऑक्टोबर 2003 : आतापर्यंत आयआयटी वा एनआयटीमधूनच बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लाखो रुपयांचे पॅकेज मिळते असा समज होता. परंतू यास तडा उत्तरप्रदेशातील एका युनिव्हर्सिटीने दिला आहे. या युनिव्हर्सिटीच्या मुलींना बहुराष्ट्रीय कंपनीतून 21-21 लाखांचे पॅकेज मिळाले आहेत. ही युनिव्हर्सिटी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे असून तिचे नाव मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. या युनिव्हर्सिटीच्या तीन विद्यार्थींना कॅंपस प्लेसमेंटमध्ये 21 लाखाचा पॅकेज मिळाले आहे. ज्या कंपनीने त्यांना घेतले आहे ती कंपनी जगभरातील बॅंकींग संस्थाना तंत्रज्ञान पुरविते.
मिडीयातील वृत्तानूसार या विद्यार्थींनीचे नाव वंशिता तिवारी, अनुश्री तिवारी आणि अनुप्रिया शर्मा आहे. तिघींना प्रत्येकी 21-21 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. या तिघींची निवड सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर म्हणून झाली आहे. तसेच आयटी ब्रॅंचच्या एका विद्यार्थींना 18.52 लाखांचे पॅकेज ऑफर झाले आहे. साल 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आतापर्यंत 991 विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॅंपस प्लेसमेंट मिळाली आहे.
या युनिव्हर्सिटीचे क्रेज वाढतेय
या युनिव्हर्सिटीच्या 1000 हून अधिक विद्यार्थ्यांना कॅंपस प्लेसमेटमध्ये निवड होईल अशी आशा आहे. गेल्यावर्षी देखील 1023 विद्यार्थ्यांची निवड कॅंपस प्लेसमेंटमध्ये झाली होती. मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचे पॅकेज मिळत असल्याने या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्याची क्रेज वाढली आहे गेल्यावर्षी पेक्षा यंदा 30 टक्के जादा विद्यार्थ्यांनी या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आहे.