PM मोदींची परीक्षा पे चर्चा, तुम्हालाही प्रश्न विचारण्याची संधी
ज्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात प्रश्न विचारण्याची इच्छा असेल त्यांनी ते प्रश्न एचडी क्वालिटीत व्हीडिओ रेकॉर्ड करायचा आहे.
Pariksha Pe Charcha 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2023 हा कार्यक्रम 27 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील येथील तालकटोरा इनडोअर स्टेडीयममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात इच्छूकांना प्रश्न विचारण्याची संधी चालून आली आहे. प्रश्न विचारण्यासाठी इच्छूकांसाठी टीव्ही9 मराठीकडून प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचंय हे आपण जाणून घेऊयात. (pariksha pe charcha 2023 students who want to ask questions prime minister narendra modi send video to tv9 marathi know details)
ज्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात प्रश्न विचारण्याची इच्छा असेल त्यांनी ते प्रश्न एचडी क्वालिटीत व्हीडिओ रेकॉर्ड करायचा आहे. रेकॉर्ड केलेला व्हीडिओ टीव्ही9 मराठीच्या tv9marathi2023@tv9.com या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. व्हीडिओ मेल करण्याची अंतिम मुदत ही 15 जानेवारी 2023 आहे. सर्वोत्कृष्ट प्रश्नाचा मुख्य कार्यक्रमात समावेश होवू शकतो.
परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या इच्छूक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पे चर्चा 2023 च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची तारीख वाढवली आहे. त्यानुसार आता इच्छूकांना 27 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी innovateindia.mygov.in/ppc-2023 या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या विद्यार्थ्यांना करता येणार नोंदणी
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 9 वी ते 12 इयत्तेतील विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना नोंदणी करता येणार आहे.
नोंदणी कशी करायची?
innovateindia.mygov.in या वेबसाईट वर जा. लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन करा. त्यानंतर विचारलेली आवश्यक माहिती भरा. नोंदणी करणाऱ्यांची विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही तुमची वर्गवारी निवडा. म्हणजे तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थी निवडा. त्यानंतर माहिती भरा आणि त्यानंतर नोंदणीसाठी सबमिट करा. त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा. आवश्यक असेल तर या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवा.