नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणाऱ्या शिक्षक पर्वामध्ये मार्गदर्शन केलं आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांनी संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000 शब्दांचा भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश, दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स, सीबीएसईची शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता फ्रेमवर्क (एसक्यूएएएफ), स्किल इंड्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यांचा शुभारंभ केला. शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवक आणि देणगीदार आणि सीएसआर देणाऱ्यांसाठी विद्यांजली पोर्टल सुरु करण्यात आलं आहे.
शिक्षण मंत्रालय शिक्षकांचे अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन शिक्षण धोरण 2020 पुढे नेण्यासाठी 5 ते 17 सप्टेंबर पर्यंत शिक्षक पर्व साजरा करत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, सुभाष सरकार आणि राजकुमार रंजन सिंह देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
शिक्षक पर्वांतर्गत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचं अभिनंदन केलं. दृष्टिहीनांसाठी भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष आणि ऑडिओ बुक्स दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरु लाँच करण्यात आल्याचं नरेंद्र म्हणाले. या शब्दकोषात दहा हजार शब्द आहेत. सीबीएसईची शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता फ्रेमवर्क याची नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. यामुळे शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी याचा उपयोग होईल, असं मोदी म्हणले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 राबवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं सांगितलं. शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातील इतर घटक यांनी त्यांच्या पातळीवर योगदान द्यावं, असंही त्यांनी आवाहन केलंय. खासगी क्षेत्रानं शिक्षणामध्ये योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलेय. शिक्षणाचा आणि सरकारी शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे, असंही ते म्हणाले. नव्या उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर होईल, असं मोदी म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 वितरण समारंभ 5 सप्टेंबर 2021 रोजी Penx आहे. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम, आंध्र प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन शिक्षक आहेत. या वर्षी पुरस्कारप्राप्तांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील दोन शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीतील द्वारका येथील बालभारती पब्लिक स्कूल आणि राजस्थानमधील बिर्ला बालिका विद्यापीठ, झुंझुनू येथील शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, करपवंद, बस्तर, छत्तीसगडमधील एका शिक्षकाला देखील राष्ट्रीय शिक्षक पुरस्करानं सन्मानित केलं गेलं आहे.
इतर बातम्या:
विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू; ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा
PM Narendra Modi addressed teachers and students on Shikshak Parv appeal to follow NEP