नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
Prime Minister Narendra Modi will address via video conferencing the event to mark one year of the New Education Policy on 29th July
Dharmendra Pradhan, Education Minister will also address the event
(file photo) pic.twitter.com/EjuZDzyDSt
— ANI (@ANI) July 26, 2021
नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित 5 + 3 + 3 + 4 असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना प्रस्तावित आहे. तीन वर्षे वयोगटापासून 18 वर्षांपर्यंतची मुले आता शिक्षणाचा अधिकार या कायद्याच्या कक्षेत येतील.
सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि 2025 पर्यंत सर्वांना मूलभूत साक्षरता प्रदान करणे, हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.
इतर बातम्या:
Prime Minister Narendra Modi will address via video conferencing the event to mark one year of the New Education Policy on 29th July